वारा

Started by smadye, July 15, 2016, 02:50:57 PM

Previous topic - Next topic

smadye

        वारा

आला आला वारा सांगे पावसाच्या धारा
इकडे तिकडे फिरे कसा  खट्याळ हा वारा

हळूच गुदगुल्या करुनि गवताला
लाजवि तो छोट्या  तृणाला

झर झर पाने झाडांची हलवी
जशी खळबळ प्रियकराच्या स्पर्शाने व्हावी प्रेयसीची

वारा घेई उंच झोका, झोख्यासंगे तरंगे पतंग माझा
कधी मनाचा कवडसा घेई, प्रसन्न करी क्षणात घालावी रुसवा

वाऱ्याचा होई हळुवार स्पर्श
मनी उठे एक नाव हर्ष

वाऱ्यासंगे दरवळे सुवास
सुवासासंगे देतो उभारी मनास
इकडे तिकडे फिरे कसा  खट्याळ हा वारा
आनंदाने छेडतो स्वरांच्या तारा

कधी वाटे वाऱ्यासंगे द्यावा  प्रीतीचा संदेश
मीलनाची आतुरता करावी त्याच्याकडे  व्यक्त

असा एक वारा असो आपुल्या जीवनी
जीवनाची लिही तो एक आगळी कहाणी

             सौ सुप्रिया समीर मडये
       madyesupriya@gmail.com