“हल्ली”

Started by anildgawali, July 16, 2016, 12:15:37 AM

Previous topic - Next topic

anildgawali

         "हल्ली"
हल्ली, मी वृत्तपत्र वाचतांना
ती मला टोकत नाही,
माझा चष्मा कुठतरी ठेऊन देते,
हल्ली, माझ्या हातून ती
वृत्तपत्र हिराऊन घेत नाही,
पेपरवाल्या पोर्याला,
पेपर उशिरा टाकायला सांगते,
हल्ली, मी बाहेर पडूलागता
ती  मला रोखत नाही,
माझी काठी कुठतरी, अडगळीत टाकून देते!
वाढत्या वयाला अन थकल्या देहाला
काही पथ्ये येतात,
त्याचा हिशेब मात्र ती काटेकोर ठेवते,
मी मात्र उगाच आपला,
भाजीत मीठ अन चहात
साखर कमी टाकली म्हणून
तिला भांडल्या शिवाय रहात नाही,
तिचा संसार फाटका दिवस
माझ्याच नावावर उगवतो
अन माझ्याच नावावर मावळतो,
हे मला येड्याला कधी कलळेच नाही!!
---------ए. डी. गवळी.
---------वसमत, ०२/०५/२०१५


:( :( :( :) :)

Shrikant R. Deshmane

मी मात्र उगाच आपला,
भाजीत मीठ अन चहात
साखर कमी टाकली म्हणून
तिला भांडल्या शिवाय रहात नाही,

ya eivaji "mala bhandlya shivay rahvat nahi" asa kivva
"mala matra ugach apla,
bhajit mith an chahat
sakhar kami takli mhanun
bhandlya shivay rahvat nahi.." asa chan vatla asta.. :)

तिचा संसार फाटका दिवस
माझ्याच नावावर उगवतो
अन माझ्याच नावावर मावळतो,
हे मला येड्याला कधी कलळेच नाही!!

he khup chan lihlay.. :)



श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

anildgawali

धन्यवाद, देशमानेजी,
मी या क्षेत्रात नवखा  आणि लहान आहे, आपली सूचनेवर मी नक्कीच लक्ष देईल,

Shrikant R. Deshmane

Anilji mi fkta mza mat mandla ho,
ani yat navkha vaigere khi nasta,
kavitemadhe fakta bhavna mahatvachi, spardha nhi..
mg lahan aso motha..
wish u all d bst.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]