अचानक तु समोर यावी..

Started by Shrikant R. Deshmane, July 16, 2016, 04:53:02 PM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

अचानक तु समोर यावी,
नजरेला नजर भिडावी,
तुला पाह्ताच तो क्षण मुकावा,
अन मझ्या काळजाचा ठोका चुकावा..

थोडं तुझ्या जवळ यावं,
काळीज माझं धड्धडावं,
तुझा हात हाती घ्यावा,
अन प्रेमाचा एक प्याला प्यावा...

तुज घट्ट मिठीत घेता,
माझे स्वप्न सत्यात येता,
मन एकमेकात विरती,
अन आपल्या जुन्या आठवनी स्मरती...

तुझ्या ओठी ना शब्द यावे,
न मजला काही सुचावे,
हिच ती प्रेमची कातर वेळ,
अन नात्याची पुन्हा सुरु झाली मेळ...

नजर तुझी खुप बोलते,
मनातले सारे राझ खोलते,
माझ्याकडे पाह्ता नयनी अश्रु वाही,
अन प्रेमाचा पाउस यावा दिशा दाही...

आयुश्याची परवड ना कळे तुला,
आभासच का वाटे सारा मला,
हो, आहे प्रेम माझ्या नशीबी काई,
अन, ती घट्ट मिठीच सारे सांगुन जाई...


                                           -श्रीकांत रा. देशमाने..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]