भावना शुन्य

Started by गणेश म. तायडे, July 16, 2016, 05:52:51 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

साचले तळे डोळ्यांत
हृदयी बांध आसवांचा
प्रवाह विरुध्द दिशेने
मनातल्या आठवणींचा
विश्वास कुणावर ठेऊ
घात माझाच झाला
ढोंगी झाकलेली डोळे
साद ऐकू येई कुणाला?
क्षणात सारे बदलले
क्षणभंगूर होते सारे
ओळखीचा चेहरा खोटा
मुखवटे उतरले सारे
प्रेम कधीच नव्हते
भावना शुन्य झाल्या
नाते विलुप्त झाले
चेतना विरून गेल्या
नसावी सांजवेळ असली
सुर्यास्त आज झाला
काळोखात हरवले सारे
काजवा विझून गेला

- गणेश म. तायडे,
   खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]