मुसाफिर

Started by पल्लवी कुंभार, July 21, 2016, 10:37:33 AM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

धावत्या काळाचा, अनुभव गाठीला
घेतला मागोवा, गतजीवनाचा
एक मुसाफिर, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा
घेई भरारी, कुतूहल पंखांना
करारी कर्तृत्व, म्हणे बिंदू सागरातला
सदा चैतन्य, जणू कोसळता धबाबा
आले सावट, शोधे काजवा अंधारातला
घालतो शीळ, असीम क्षितिजाला
चालत राहा, खुणावे वाट शोधकाला
लाभे कस्तुरी, क्षणभंगुर जीवनाला

~ पल्लवी कुंभार