देव बरोबर करते सारं...

Started by गणेश म. तायडे, July 21, 2016, 04:21:59 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

देव बरोबर करते सारं

देव बरोबर करते सारं
म्हणून काय करायची गरजचं नाही?
खायला चणे आहेत
पण चावायला दातच नाही,
आहे सर्व काही
पण वापरायला बुद्धीच नाही,
मनात दडले सारे काही
पण व्यक्त करायची ताकद नाही,
देव बरोबर करते सारं
म्हणून काय करायची गरजचं नाही?

सहत आहेत सारे काही
पण प्रतिकाराची बाबच नाही,
बोलायला जिभ आहे
पण खरे कुणी बोलतच नाही,
जबाबदार झाले सारे
पण कर्तव्य कळतच नाही,
देव बरोबर करते सारं
म्हणून काय करायची गरजचं नाही?

दररोज मरतात सारे
पण जगण्याची इच्छाच नाही,
माय बाप देव सारे
पण कोणी मानतच नाही,
करायला आहे खूप काही
पण करायला वेळच नाही,
देव बरोबर करते सारं
म्हणून काय करायची गरजचं नाही?

वाचली पुस्तके सारी
पण ज्ञानाचा पत्ताच नाही,
पैशाने श्रीमंत झाले सारे
पण गरीबाची कदरच नाही,
रडतात लोक सारी
पण हसणे माहितच नाही,
देव बरोबर करते सारं
म्हणून काय करायची गरजचं नाही?

प्रेम करतात सारे
पण प्रेमासाठी मनच नाही,
उठले रक्त सांडायला सारे
पण रक्ताला रक्ताची जाणंच नाही,
जातपात मानतात सारे
पण बंधुता उरलीच नाही,
देव बरोबर करते सारं
म्हणून काय करायची गरजचं नाही?

आभाळा एवढी घरे सारी
पण घराला घरपणच नाही,
चटके सहन करतात सारे
पण सावलीची ओढच नाही,
पुर्णब्रम्ह अन्न सारे
पण गरीबाच्या नशीबी ब्रम्हच नाही,
देव बरोबर करते सारं
म्हणून काय करायची गरजचं नाही?

- गणेश म. तायडे,
    खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com