***** न समजलेलं *****

Started by Shri_Mech, July 21, 2016, 06:01:08 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

न समजलेलं


समजत नव्हतं काहीच
कसल्या होत्या भावना
विरहाचा परिणाम होता
कि दुर्लक्षाचा त्रास;
कळायला मार्ग नाही


अर्ध्या अधुऱ्या गोष्टी
सतवत होत्या राहून राहून
अस्वस्थ जाणीव होती मनाला
न समजावता येणारी


शून्यात असते नजर
खिडकीतून डोकावताना
सलत राहते काहीतरी
न दिसणाऱ्या कोपऱ्यात


निराशाच होती ती
पण कारण काही उमजेना
तिने सोडून काळ लोटला
पण हरल्याची भावना जाईना


दुःखाचा वियोग तरी
किती करून झालेला
तिचं असं झिडकारणं
किती मनाला टोचलेलं;
तरीही हे असं का वाटावं...?


इतकं अंतर वाढूनही
प्रेम कसं उतरेना
किती केला राग तरी
मनातलं घर ती सोडेना


हाता-तोंडातला घास गेल्याचं
दुःख असतं कुणाकुणाला
रिकामंच होतं ताट माझं
तरी मन कसं काय दुखलं....?


शब्दांच्या पकडीत न येणारं
भावनेच्या सागरात लपलेलं
माझ्या मेंदूला न झेपणारं
असं काहीतरी घडत असावं, बहुधा...

Shri_Mech
Shri_Mech