पीरम

Started by sneha31, July 22, 2016, 03:46:11 PM

Previous topic - Next topic

sneha31

लई पीरम केल र तुझ्यावर
जस राधेच व्हत कृष्णावर

लई सपान दाखवलय तु
पुर्ण होतील अशी आस दाखवली मी

बेभान व्हत आपण दोघ
समंध गेलय र हातुन

नीजली मी तुझ्या खांद्यावर
शपथा घेतल्या साथ देऊ आयुष्यभर

नियतीनच हरवलय र
एकटी मी आता पळलीय र

आयुष्याच्या या काट्यांच्या वळणावर
का तु मला एकटीला सोडुन गेला र

कशी जगु आता तुझ्या बिगर
तुझ्यासाठीच तर धडकतय माझ हे जीगर

स्नेहा माटुरकर
नागपुर (भंडारा )

Dipak Shirsat


sneha31