***** दान करणे आहे *****

Started by Shri_Mech, July 24, 2016, 03:31:47 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

दान करणे आहे


तिने केलेली प्रेम बरसात
तिच्या मायेचा ओलावा
तिचा भावलेला भाबडेपणा
तिच्या शब्दांची गहराई
दान करणे आहे


तिच्या डोळ्यांची निरागसता
तिच्या आवाजातली गोडी
तिच्या स्पर्शाचा शहारा
अन नथेची नजाकत
दान करणे आहे


तिच्या येण्याची पाहिलेली वाट
तिने काढलेला रुसवा फुगवा
तिच्या 'sorry' ने वितळलेला राग
तिच्या येण्याने फुललेला श्वास
दान करणे आहे


तिने दिलेली बासरी
महाबळेश्वरला घेतलेली हॅट
FC रोड ला घेतलेलं वॉलेट
'आशिकी-2 ' ची दोन तिकिटे
दान करणे आहे


सिंहगडावर केलेला कल्ला
'वैशाली' मधे केलेली धमाल
'भुशी डॅम' चे 'शाही स्नान'
अन 'लोहगड' वरची भटकंती
दान करणे आहे


एवढेच नाही तर,

नशिबाने आमची सोडलेली साथ
संकटांनी केलेला पाठलाग
मनात खोलवर रुतलेले घाव
मजबुरीने तिने मोडलेला डाव
सुद्धा दान करणे आहे


आम्ही पाहिलेली स्वप्ने
तिने दाखवलेली आशा
तिने दिलेल्या आठवणी
एकमेकाला घातलेल्या शपथा
दान करणे आहे


ती गेल्यावर आलेलं वादळ
तिच्या विरहाचा तप्त दाह
न संपणारा दिवस
अन खायला उठणारी रात
दान करणे आहे


पार कोमेजलेली आमची मने
नैराश्याचा खळखळता प्रवाह
अश्रूंनी चिंबलेली शेवटची भेट
अन टाळलेला आत्महत्येचा विचार
दान करणे आहे


गरजवंतांची वाट
मी खूप वेळ पहिली
सांगा कोणी घेतंय का
माझ्या या गोष्टींचं दान...?


Shri_Mech
Shri_Mech