पंचवीशीच्या उंबरठ्यावर.

Started by Dnyaneshwar Musale, July 25, 2016, 08:24:41 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

पंचवीशीच्या उंबरट्यावर
जरा अवघडच आहे
दिसुन सुद्धा वय
काढण्याचं गणित आहे

कुणी ओळखीचं,
कुणी अनोळखी भेटत
विश्वास ठेवणार आपलं
कोणी असावं असंही वाटतं
प्रत्येक गोष्ट घरी सांगायला
काळीजही फाटतं.

रस्ता दिसला की
चालायला लागतं
वेळ काढुन आरश्यात
स्वतःला बघावा लागतं
आरश्यालाही आपल्यासाठी
कधी हसावं लागत.

हे कर ते कर
जवळचा म्हणुन
सगळेच  सांगतात
काटा मोडला तर
तेच गावभर पांगतात.

दोन चार धडे
घेऊन ऐन पंचवीशीत बाजारात येतं
Fresher आहे म्हणुन
कोणी तंम्बाखु मळुन घेत,
अवगडल म्हणुन तसचं वाहुन जातं.

वयात आलाय म्हणुन कुणी
भलतेच विषय छेडु लागतो,
मनात कुणी होतं
ते ही हळूहळू खोडुन जागतो,
स्वप्नांचा उजेड करून
झाल्या गेल्याची 
आकडेमोड गिरवत  असतो
मग झोपेतच येणारा
पगार मोजत बसतो.

थोडं लहान बनावं म्हटलं
तर आवाज होतो चांगलं
होत पण आज बाटलं
त्याक्षणी लक्षात येतं
पंचवीशी दार आता आपण गाठलं.


वेडं होऊन हसत हसत असच चालायचं,
स्वप्नपुर्ती साठी थोडं जगाला भुलायचं,
जिंकुन तु आता आनंदाला खोलायचं
भेटलो कधी, तर एकदा
तोंड भरून मनातलं बोलायचं.