मैत्री करताना काही सिमा असाव्यात का?

Started by SagiGharage, July 27, 2016, 08:10:17 PM

Previous topic - Next topic

SagiGharage

मैत्री करताना काही सिमा असाव्यात का?

त्यातल्या स्थित्यतंरांची शोध घेतोय..
अर्थाचे गैरअर्थ करणारी त्याच प्रकारे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्याकरीता एकत्र आलेली दोन लोकं जेव्हा त्यांच्यातल्या मैत्रीला वेगळ्याच भावनेचा अर्थ लावत असतील तर त्यातील प्रत्येकांस मैत्री नामक जिन्नस नेमका व योग्यपणे समजलाय का असा प्रश्न पडतो..

मैत्री ही केवळ एक भावना नसून विश्वास असते, जिला केवळ नाते असे नाव देताच येणार नाही..

आज कालची मैत्री-
बहुधा काही मित्र मैत्रिणी असे ही असतात जे पुढील काळात बहीण भाऊ होतात. आपसांतील वर्तणूकीचा स्वत:ला लागलेला अर्थ मैत्रीवर थोपवणारी अशी frnds नावाची सर्कलं नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात कुणास ठाऊक??

आपल्या मित्रांची वर्तणूक आपणांस पटत नसेल वा त्यांचा अति सलगीपणा रुचत नसेल  तर तुम्ही त्याच्याशी स्पष्टपणे चर्चा करा.. विषय संपवा. यामूळे गुंतागुंत अथवा गैरसमज निर्माण होत नाहीत.

पण काहीक मंडळी, असे काही वाटलेस मैत्रीस बहीण-भाऊ, काका, मामा न जाणो अशा कित्येक नात्यांची नवी झालर चढवून मोकळे होतात. यामूळे आत्मिक समाधान इतकेच की त्या व्यक्तींपासून आता मला इनसेक्युअर वाटणार नाही.

पण त्यावेळी त्या मित्रांमध्ये असेही काही मित्र असू शकतील ज्यांच्या मनात तुमच्याविषयीची भावना केवळ एक मित्र वा केवळ एक मैत्रीणच असेल..

अशावेळी तुम्ही त्यांच्या वर लादलेले हे अस्वाभाविक नाते त्यांच्या मनात तुमच्याविषयी नकारात्मक छबी निर्माण करु लागते याचाही विचार केला पाहीजे.

तद्नंतर तो मित्र, ती मैत्रीण, ते मित्र पुर्ववत रहात नाहीत. मैत्री मधून इतर नात्यात गोवले गेलेले मित्र  पुढील काळात निर्मळ मनाने एकत्र य़ेऊ शकत नाहीत.

त्यामूळे मैत्री करत असताना विचार करा... केल्यानंतर विचार करु नका.. शेवटपर्यत एक मित्र म्हणून रहायचे की इतर कोणी याचा विचार तुम्ही कराच पण पुढील व्यक्तीवर आपले नाते लादू नका.. आपल्या मित्रांच्या भावनांचा, त्यांच्या आपल्याविषयीच्या भावनिकतेचा विचार करा.

Friends Forever.. हे बोलण्यातून नव्हे तर आपल्या वर्तणूकीतून दर्शवून द्या.. आपल्या मित्रांत असणारी मैत्री आदर्श बनवा.. निर्मळ बनवा...
अतुट बनवा..

- सागर घारगे, सांगली ♥♬♬©®
©®
*लेखन: सागर घारगे*, सांगली
मोबाईल: 9960450648