प्रेम कोणावर करावे?[उत्तरासहित]

Started by Akshay Bansode, July 29, 2016, 11:24:19 AM

Previous topic - Next topic

Akshay Bansode

*शीर्षक-*
*_प्रेम कोणावर करावं?_*
*[उत्तरासहित]*
*कवी*-  _*मुकेश*_ आणि _*अक्षय*_

प्रेम कोणावर करावं
सुंदर चेहऱ्यावर ,
सुंदर मनावर की
प्रेमळ स्वभावावर...

प्रेम कोणावर करावं
गोऱ्या रंगावर,
निर्मळ मनावर की
साध्या राहण्यावर...

प्रेम कोणावर करावं
बघताच हसणार्यावर,
बघताच लाजणार्यावर की
बघताच रागवणार्यावर...

प्रेम कोणावर करावं
माणसांवर की प्राण्यांवर
प्रेम कोणावर करावं ???
हेच कोडं आहे न सुटणारं ....

दुनियतेलं प्रत्येक कोडं अखेर केंव्हा ना केंव्हा तरी उलगडतं,
संध्याकाळी उमलणारी कोमल फुले सकाळ होताच पुन्हा फुलतात...

कवी *मुकेश*ला ते कोडं
सुटता सुटेना,
कोडं सोडवल्यावाचून मन कुठेच रमेना.

कवी *अक्षय* प्रयास
करतो सोडवण्या
हे अजब कोडं,
प्रत्येक मानवाने *प्रेम* करावं एकमेकांवर
थोड थोडं..

हीच अपेक्षा ठेवूनी
उलगडूया प्रेम कोणावर
करावं,हे कोडं..!

प्रेम करावं
आधुनिक विचार मांडणाऱ्या
*"आधुनिक"* मानवांवर..

प्रेम करावं
जातीधर्मांच्या भिंती
तोडणार्या
*"विद्रोही"*मनांवर..

प्रेम करावं
अंधश्रध्देला थारा न  देणाऱ्या
*"विज्ञानवादी"*मेंदूवर..

प्रेम करावं
समतावादी विचार मांडणार्या..
*"मानवता"*वाद्यांवर..

प्रेम कराव
निस्वार्थीपणे काळजी घेणाऱ्या
*"आई-बाबा"*यांच्यावर.

प्रेम करावं
भाऊ चुकीचे वागला तर
त्याला थप्पड देणाऱ्या *"धाडसी"*बहिणीवर..

प्रेम करावं
बहिणीनं शिकावं म्हणून
हट्ट धरणार्या
*"सुशिक्षित"*भावावर..

प्रेम करावं
तळमळीने शिकवणार्या
*"सच्च्या"*शिक्षकांवर..

प्रेम करावं
जीव ओतून मदत करणाऱ्या
*"जीवलग"* यारांवर..

प्रेम करावे सगळी
दुःखे विसरुन कविता
रचणार्या *"दिलदार"*कवींवर..

*कवी..*
मुकेश शिगवण
8097377607
आणि
अक्षय बनसोडे...
7219331933

sneha31