तुझं माझं नातं...!

Started by Ravi Padekar, July 29, 2016, 12:24:54 PM

Previous topic - Next topic

Ravi Padekar

तुझं माझं नातं...!

तुझं माझं नातं
आहे फक्त मैत्रीच
गुंतते नकळत मन तुझ्यात
म्हणून त्याला नाव नको प्रेमाचं

प्रेम बिम नको रे
फक्त साथ तुझी हवी
मन मोकळं बोलायला
फक्त फुरसत तुझी हवी

माझ्या बोलण्याची नको
अशी सारखी सवय करून घेउस
मैत्रीच्या आपल्या नात्याला
अस प्रेमाचं स्वरूप देऊस

काल तोल माझा जाताना
आधार तू दिलास
बरं वाटलं जेव्हा
तू हात पुढे केलास

हातात हात आल्यावर
नातं शोधत बसला प्रेमाचं
पण तुझं माझं नातं
फक्त राहू दे मैत्रीच

कवी- रवि पाडेकर. (मुंबई)
मो.-8454843034.

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Ravi Padekar