का असं घडतंय?

Started by SagiGharage, July 31, 2016, 01:48:33 AM

Previous topic - Next topic

SagiGharage

का असं घडतंय? ५ मिनिटांचा वेळ लागेल वाचायला... पण अतिशय गंभीर विषय आहे... प्लीज वाचा...

आजकालच्या या ग्लोबल वार्मिंग च्या समस्येमध्ये आणखी एक गंभीर समस्या येऊन ठेपलीय. तापमानवाढ- जी आजकालच्या तरुणांच्या मेंदूमध्ये वाढतेय..

(सत्य घटनेवर लेख)
नेहमीसारखीच एक रात्र... रात्रीचे १०:३० वाजले असतील.. मी नेहमी प्रमाणे रुममध्ये मोबाईल वर मित्रांशी च्याटींग करत होतो. आणि अचानक रुमच्या दरवाज्यावर कोणीतर थाप मारत ओरडत असलेलं जाणवलं... आवाज ओळखीचा होता.. बाहेरुन आई मला जोर जोरात हाक मारत होती....
मला काही कळेना... पटकन उठलो.. धावत दरवाजा उघडला... बाहेर आई... "अरे जा लवकर शेजारची मनीने(नाव बदलले आहे) दरवाजा लावून घेतला आहे.. सगळे ओरडतायत पण उघडत नाहीये"

मनीषा.. वय वर्षे १५ , हसरी... मिसळणारा स्वभाव... आपल्या घरांत स्रवांत लाडकी, आई-वडीलांचा या पोरीवर खुप जीव पण ती असं काही करेल याचा विश्वास बसत नव्हता...

मी गोंधळलो, आहे तसा तडक तिच्या घराकडे पळालो.

आमच्याच २ खोल्यांमध्ये भाड्याने त्यांचं कुटूंब रहायाला होतं. एका खोलीत स्वयंपाकघर तर दुसर्या खोलीत हॉलसारखी व्यवस्था केलेली...

त्या खोल्यांजवळ पोहचलो तर दुसर्या खोलीजवळ मनी ची आई तिचे वडील, भाऊ, शेजारील काका आणि माझा एक मित्र जोरजोरात लाथा मारत दरवाजा तोडायचा प्रयत्न करत होते... तिच्या आईला घाबरुन आपण काय बरळतोय हे पण तिला कळत नव्हतं... बाप कुर्हाडीने दरवाजावर घाव घालत होता... भाऊ आणि तो मित्र दरवाजावर लाथा घालत होते...
मी देखील त्यांच्यात सामील झालो.. मला आत काय चाललंय कळत नव्हतं... न थांबता लाथा मारत होतो... मनी आतून हाकेला ओ देत नव्हती... मग मात्र भाऊ बाजूला झाला...आणि बाजूच्या खिडकीकडे पळाला... सिंमेंटच्या जाळीदार खिडकीतून त्याने आत पाहीलं....
आणि.......
आता त्याच्या चेहर्याची पार रया गेली होती... कोणते ही भाव दिसत नव्हते... काही अनर्थ तरी झाला नाहीये ना या भितीपोटी मी देखिल खिडकीकडे पळालो... तिकडे दरवाजा तोडण्याचे प्रयत्न चालूच होते.... मी खिडकीतून आत पाहीलं...
मेंदूंला जबरदस्त असा विजेचा झटका बसावा अशी हालात झाली... एक नाजूक पोर छताला लटकताना दिसत होती.. तिच्या चेहर्यावर तिचे केस विस्कटले होते...

मग मात्र दरवाजा तोडायचा प्रयत्न आणखी वाढला... काही क्षणांतच दरवाजा मोकळा झाला......

आम्ही आत घुसलो .. आवळलेला फास मोकळा केला... त्या पोरीला तिच्या बापानं आपल्या कवेत घेतलं... तिची आई तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होती... पण ती कसलाच पर्तिसाद देत नव्हती... कदाचित वेळ निघून गेली होती.... कदाचित तिच्या लेकराची प्राणज्योत मालवली होती...... आता मात्र आई मुर्छा येऊन पडली....

तरीपण तिला तातडीने दवाखान्यात हालवले..... तिच्या बापाचा आपल्या पोरीसाठी तुटणारा जीव... त्याच्या जीवाची घालमेल पाहून मन आतून भेदरुन गेलं.... डॉक्टरांनी पण केस संपल्याचा निर्वाळा दिला......

आता मात्र बाप ओक्सा बोक्शी रडायला लागला... त्या डॉक्टरानां परत एकदा चेक करायला सांगू लागला....... इतकी हवालदील मनस्थितीमध्ये मी त्यांना कधीच पाहीलं नव्हतं...


कारण काय??

जेव्हा मला कारण कळाले तेव्हा मात्र मला मनीच्या मृत्यूच्या दु:खा पेक्षा तिची किवच जास्त येऊ लागली...

घरची मंडळी स्वयंपाकघरात जेवण करत होती.. ती पण नेहमी पर्माणे जेवली..... कोणीतरी तिला रागावले... तिला राग अनावर झाला आणि ती पलीकडल्या खोलीत निघून गेली.. नेहमीप्रमाणे ही अशी रागावते म्हणून कोणीच तिच्या मागे तिला समजवायला गेलं नाही.... कारण तिचा राग नंतर शांत व्हायचा.... पण ही वेळ मात्र निराळी निघाली... सगळे जेवणानंतर ८-१० मिनीटांनी त्या खोलीकडे आले... तर दरवाजा आतून बंद..... मग मात्र सगळे घाबरले... आरडाओरडा, हाका- आरोळ्या आणि खूप काही.....


मला कळत नाही की,

आपल्या पालकांना भिती दाखवण्यासाठी आजच्या पोरांना असा भयानक मार्ग का मिळतो???
राग अनावर होत नाही म्हणून जीवाशी खेळ करण्यात कोणतं शहाणपण???
आपल्या आई-वडीलांना आपल्यावर रागवण्याचा थोडाही हक्क नाही का??
कोणतंही टेन्शन आपल्या जीवनापेक्षा मोठं असू शकतं का??
का ही मुलं आपल्या माता-पित्यांचा विचार करत नाहीत??
का त्यांना मृत्यू हाच चांगला प्रयाय वाटतो??


असे कितीतरी प्रश्न त्या दिवसांपासून माझ्या मेंदूचे चिथड्या उडवत आहेत....

अरे बाळांनो... माणूस जन्माला एकदाच येतो.... ज्नम जगण्यासाठी असतो... मृत्यूची वेळ ठरवण्याइतका महान या जगात कोणीच नाही....

अपयश, न्युनगंड, भिती, राग यासारख्या गोष्टी जीवनाला पुरक आहेत.. त्यावर मात करुन पुढे जाणे यालाच तर आयुष्य असे म्हणतात..

जगात असा कोणताच प्रश्न नाही ज्याचं उत्तर मृत्यू असेल.... तेव्हा हे संुदर जीवन भरभरुन जगायला शिका.... मोठ्ठे व्हा... स्वत:बरोबरोच आपल्या आई-वडीलांची काळजी घ्या.... तुमच्याशिवाय त्यांचं जगणं अपुरं आहे...
अशा आत्महत्या सारखे प्रकार करुन त्यांना नरकयातना देऊ नका..

कसलेही टेन्शन असो वा कसली ही गोष्ट तुम्हाला छळत असेल, तर्ास देत असेल तर त्याविषयी आपल्या माता-पित्यांशी बोला... मित्रांशी बोला.... शिक्षकांशी बोला...... मार्ग नक्की मिळेल....


पण लक्षात ठेवा कोणत्याच प्रश्नाचा मार्ग मृत्यूपरयंत जात नाही.....


त्या मुलीच्या आत्म्यांस चिरशांती लाभो..... ही प्रार्थना.....💐💐🙏

हा मेसेज जास्तीत -जासत मित्रांजवळ पोहचवा... त्यांना समज मिळावी हाच यामागील प्रयत्न...!!

धन्यवाद...🙏
©®
*लेखन: सागर घारगे*, सांगली
मोबाईल: 9960450648