अखेरची भेट

Started by SagiGharage, July 31, 2016, 08:05:43 PM

Previous topic - Next topic

SagiGharage

* अखेरची भेट *

रिपरिपत्या पावसात तिची..
लाल साडी भिजत होती..
हिरव्यागार चूड्यांत वेडी
पुढ्यात हुंदके दाबत होती..
निळ्याशार डोळ्यात तिच्या..
अखेरचं मला साठवत होती..
अर्ध्यावरचा मोडूनी डाव..
अर्धवट वचने पाठवत होती..
काळ्या मन्यांची रेशिमदोरी..
चिमटीनं सारखं उडवीत होती..
एकजीवाची फोड करुनी
असंख्य तुकडे तुडवीत होती..
अबोल तिच्या ओठानी जरी...
भाव अंतरीतले सांगत होती..
तुटली ती रंगलेली स्वप्ने
जी तिच्यात कधीतरी नांदत होती..
मग... मग थोडा वेळ ती थांबली,
मग मागे फिरुन निघू लागली..
शब्द ओठातच विरुन गेले..
आता नजर ही तिरकस बघू लागली..
भरपावसात तिचे ते जाणे..
त्यात रडणे माझे दिसले नाही..
खूप जमले प्रेम सांगणे..
पण प्रेम करणेच जमले नाही
पाठमोर्या आकृतीकडे तिच्या..
मी नुस्ताच उभा पाहत राहीलो..
जस जशी ती भिजत गेली..
तस तसाच मी जळत आलो...

शब्दरचना: सागर घारगे,सांगली
9960450648 ©®©
©®
*लेखन: सागर घारगे*, सांगली
मोबाईल: 9960450648