माळरानी अबोला.

Started by Dnyaneshwar Musale, August 01, 2016, 01:34:54 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

मी तसाच आहे माळरानात
तु येणार एवढंच ठेवलंय ध्यानात

शाळा संपली की तु यायची
मावळलेल्या दिसाची सकाळ होऊन जायची
वह्या पुस्तक हे तुला कळत होतं
दप्तर म्हणजे काय हे माझ्या
स्वप्नातल्या गिरणीत दळत होत.

तु जाता येता हसायची
दिवस बुडाला तरी एक दिवस नसायची
माझी जनावर माझ्या कडे बघायची
तव्हा कळायचं  आईतवारी शाळा नसायची.

तु शाळेत जाताना पावसात
मैत्रिणी सोबत एकत्र जायची
मग तुला ओळखण्याची
मोठी माझी पंचाईत व्हायची
पण त्याचवेळी  तुझी रंगलेली
एका  हातावरची मेहंदी दिसायची.

तु जेव्हा कॉलेजला गेलीस
तव्हा मी पण अक्षरांची ओळख केली
तु सायकलवर बिनदास्त  जायची
तुझ्या सायकलच पोस्टर वाचायला
मी शिकावं अशी आशा मनात यायची.

तुला सायकलचा जणु कंटाळा
आला होता ते तुझ्या activa नी सांगितलं
त्या गाडीच्या आरश्यात कधी
मी माझा चेहरा बघावा असं वाटायचं,
पण आरसा तर लांबच राहिला पण तुला
जवळुन बघायला काळीज फाटायचं.

तुझं आता कॉलेज संपलं
या उजाड माळरानातुन आता
तु कधी जाताना दिसणार नव्हती,
तुझं नाव मी लहानपणी
एका बाभळीवर कोरलं होतं
तेच माझ्या हृदयातही आज उरलं होतं.

आता खुप वेड्या बाभळीचे
काटे झालेत बोचुन,
एकदा पुन्हा या माळरानी ये
पेरलेल्या आठवणी
ओंजळीत वेचुन घे.