तू तिथे अन मी इथे

Started by पल्लवी कुंभार, August 03, 2016, 02:56:49 PM

Previous topic - Next topic

पल्लवी कुंभार

तू तिथे अन मी इथे
न पटणारे पण, सत्य खरे
मन पहाते स्वप्न, तुझे बावरे
दिन उजाडे मस्त, पाहता रूप गोजिरे

जीव व्याकुळे, सतत भास तुझे
ना करमे, क्षणात युग रकडे
मन रमवे, कामात मोद मिळे
सवय पडे, अस्तित्व रोमांत भिणे

ना कळे, का हृदय गुंतले
नकळत वेडे, मन ओढावले
नभात पसरे, चांदणं कोरडे
रात्रीला नसे, चंद्राचे साकडे

तुझे येणे, जीव घायाळ करते
नजरानजरेत, अंतरंग न्याहाळते
बोलून सारे, मन रिते होते
स्पर्श अनावर, विरह बोलते

~ पल्लवी कुंभार

Shrikant R. Deshmane

ना कळे, का हृदय गुंतले
नकळत वेडे, मन ओढावले
नभात पसरे, चांदणं कोरडे
रात्रीला नसे, चंद्राचे साकडे

तुझे येणे, जीव घायाळ करते
नजरानजरेत, अंतरंग न्याहाळते
बोलून सारे, मन रिते होते
स्पर्श अनावर, विरह बोलते

khup chan lihlay pallaviji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]