*धरणीमाय*

Started by sachin totwad, August 04, 2016, 02:28:51 PM

Previous topic - Next topic

sachin totwad

🌧😐 धरणीमाय😐🌧


आभाळाकडे टक लावून बसलेली धरणीमाय
आभाळा तू आता तरी बरसशील काय?😒😒



शेतकरी माझा बाप राबराबतो उन्हांत🌋🌋
करतो कष्ट आणि खातो चटणी-भातं🍚
कधीरे बरसशील या काळ्या मातीवर?☁️☁️
माझ्या बापाने दुःख सोसलं छातीवर😐😐
आभाळा तुला आमची परवा नाही काय? 😔😔


आभाळाकडे टक लावून बसलेली धरणीमाय
आभाळा तू आता तरी बरसशील काय?😥😥



धरती ने सोसले खुप काही
आभाळा तु केलीस तिची लाही लाही😡😡
तु एकटाच जबाबदार नाहीस काही
तुझ्यासोबत या सरकारनेही केल नाही काही😁😁
आभाळा तुला आमची परवा नाही काय? 😢😢


आभाळाकडे टक लावून बसलेली धरणीमाय
आभाळा तू आता तरी बरसशील काय?😐😐



आभाळा तु नाही बरसला तर होतं काय?
त्याचे तुला परिणाम माहित नाय काय?😢😢
शेतकरी लावतो गळ्याला फास
माझ्या आईची संपते जगण्याची आसं..😭😭
आता तरी बघु नकोस मरणाची आसं😴
आभाळा तुला आमची परवा नाही काय?😢😢


आभाळाकडे टक लावून बसलेली धरणीमाय
आभाळा तू आता तरी बरसशील काय?😢😢

कृपया नावासहित शेअर करा
Sachin totwad...