कंटाळा

Started by amoul, December 31, 2009, 01:59:16 PM

Previous topic - Next topic

amoul

मन उदास उदास,
दिन भकास भकास,
श्वास फक्त त्रास देतो,
टिचभरस्या नाकास.

गुदमरतो हा श्वास,
घुटमळते पाउल,
खोल मनात दडलेली,
अनाम भीतीची चाहूल.

ना व्यापार कोणता,
ना करावयास धंदा,
आणि ढकलून हि जाईना,
दोन क्षणातला सांधा.

क्षण बसतो मी किती,
तरी लागेना समाधी,
कल्पनेत रमण्याची,
मज जडलेली व्याधी.

मी आता वेळेला अन वेळ देखील मला घाबरत नाही.
मी पोहोचलो लवकर वा उशिरा काय,
मजसाठी कोणी जगत वा मजवाचून कोणी मरत नाही.

ना उगवत्याचे भान आहे,
ना मावळत्याची  जान आहे,
ना उगवत्यास प्रणाम आहे,
ना मावळत्यास सलाम आहे.
उजेड किंवा अंधार काय ,
मला दोन्ही समान आहे.

आता मी आहे,
नंतरचे मला ठाऊक नाही,
आज माझे भरेल  पोट,
मला उद्याची भूक नाही.

........................

santoshi.world

chhan ahe kavita ...... hya oli tar mastach ahet .......
उजेड किंवा अंधार काय ,
मला दोन्ही समान आहे.

rudra