आघात

Started by NageshT, August 05, 2016, 09:33:38 PM

Previous topic - Next topic

NageshT

नागेश टिपरे लिहतोय.......


**** *आघात* *****
                 तो शनिवारचा दिवस होता. सुर्य हळुहळु मावळतीकडे झुकु लागला होता. सुर्याची तांबूस किरणे मनाला मोहुनच टाकत होती. निसर्गाला आज काय आनंदाचे उदाण भरून आले होते. वाय्राचा प्रवाह जास्त होत होता आणि क्षणार्धात निळ्याभोर आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाऊस येण्याची चिन्हे दिसु लागली. बळीराजाने हाताला वेग दिला आणि तेवढ्यात पावसाची रीपरीप सुरवात झाली. मातीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. पक्षी आपआपल्या घरट्यामध्ये दबा धरून बसली होती. मेंढपाळ व गुराखी आपआपले कळप हाकत घराच्या दिशेने पाऊले उचलत होती. विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटीने पावसाने जोर धरला ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागली.
                  जसा- जसा पाऊस जोर धरत होता. तसा-तसा आबांच्या काळजा ठोका मात्र वाढतंच होता. कारण तालुक्याच्या ठिकाणाहुन घरी येणारा त्यांचा मुलगा श्यामा मात्र आजुन आला नव्हता. रात्र होऊन बरीच वेळ सरली होती. मुलाच्या काळजी पोटी आबांनी तालुक्याच्या ठिकाणाला जायचा निर्धार केला.
                मी जरा श्यामा का आला नाही हे पाहुन येतो असे आपल्या बायकोला बजावले. त्याची बायको रखमा ने गोणफाटांचा गोगंता हातात देत म्हणाली जरा बीगी-बीगी जावा नदीच पाणी वाढत चाललया
मध्येच त्याची लहान पारू पुटपुटली आव आबा जीवून गेला आसता तर बरं झाल आसतं पारूची
पारूची समजुत काढत गोंगता हातात घेत आबांनी घराबाहेर पाऊल टाकला. गावची इस ओलंडताच तालुक्याच्या वाटेवर झपाझपा पावले टाकु लागले. मध्यानंतर झाली होती आबा शिव ओलडुन हारणीचा माळ उतरू लागले. आता दोन-चार मैलावर तालुक्याच्या झगमगत्या बत्त्या दिसु लागल्या. नदीच्या खळखळत्या पाण्याचा आवाज हारणीच्या माळावर स्पष्ट ऐकु येत होता. आबा  लगबगीने नदीपाशी पोहचले व विठ्ठलाच नाव घेत नदीत सुर मारला. नदीचा प्रवाह त्यांना खालीखाली वाहुन नेहत होता. पण मुलाच्या काळजीने पाणी तोडत त्या पाण्याला तोंड देत त्यानी पलीकडील काठ गाठला, पावसाची टिपटिप तशीच चालु होती.
    अंगावरील अंगारख्यातुन पाणी टिपकत होतं. वाय्रातील गारवा गोठवुन टाकत होता, थंडीन मात्र काळीज गोठल होत. रातकिड्यांची चिरचिर व बेडकांची आनंदाने होणारी डरावडराव जणु शांतताच भंग करत होती. तशा शांततेत आबा श्मा राहतो त्या घराकडे वळाले. पहाटे-पाहटे घरासमोर येताच दाराची कडी वाजवली, थोड्यातंच दार उघडले गेले आणि आबां पाहताच आतल्या पोराच्या तोंडातुन शब्द पडला आबा! आनं तुमी; इतक्या रातच्याला चला आत या बरं त्यावर आबा बसक्या आवाजात पुटपुटले दर सनवारच्याला श्यामा घरी येत आसतोया आनं त्यो येनार आसल्याचा निरूप पन धाडला होता. आला नाय म्हणुन बघायला आलु
त्यावर श्यामाचा मित्र बोलला तो तर सांच्यालाच गेला हाय बघा तुमची आन त्याची चाकामुक झाली आसल बगा
                आबा लगेच परतीच्या प्रवासाला लागले. मस्तकात विचारांनी थैमान घातले. जसकाय त्या ठिकांची जागा त्यांना ऊचलुन फेकत होती. आबा जसेजसे पावले ऊचलत होते. तसेतसे मस्ताकात विचारांच वावंटळ उठत होतं. आबांची पावले आता घाईत घराच्या दिशेने पटापटा उचलत होती. सुर्य उगवतीच्या वेळीस आबा नदीपाशी आले. चिखलाने माखलेले पाय धुतले व नावाड्याला आवाज देऊन नावेत बसले. नदीचा ओघ ही आता कमी झाला होता. काही वेळातच कडेला उतरताच चारआणे नावाड्याच्या हातावर टेकवत आबा चालु लागले. हारणीचा माळ चढुन गावापाशी पोहचले.
                 गाव सुन्न पडले होते, आशातच आबा घराजवळ आले. काय झाले त्याना काही कळेना घरापुढे तर प्रचंड गर्दी जमली होती. सर्वत्र शांततेचे वातावरण पसरले होते. प्रत्येका काय झाले ते विचारत होते परंतु कोणीही काही सांगण्यास तयार नव्हाता. या गर्दीतुन वाट काढत आबा वाड्याच्या पुढच्या दरवाज्या पाशी आले, मनात तह्रा-तह्रांच्या विचारांनी गोंधळ घातला होता. सर्व विचार बाजुला करून त्यांनी वाड्यात पाऊल टाकला. त्यांचे लक्ष रखमा व पारू कडं गेल अनं आबांना बघताच त्या दोन मायलेकरांनी टाहो फोडला. त्यानी नजर आता पुढे टाकली अनं पायाखालची जमिन सरकली. ज्याला लहानाचा मोठा केला, वाढविले खेळवले त्याच मुलाचा नदीचा कालचा पुर त्याचा जीव घेऊन गेला होता. उभ राहण्यास आता धरणी कमी पडु लागली होती. आबा भिंतीला टेकुन होते आणि ते तसेच खाली बसले. त्यांच्या मनात एकच विचार येत आसावा
"पाणी म्हणजे जीवन" का "जीवन म्हणजे पाणी"
आबा आता कायमचेच शांत झाले होते. सुर्याच्या तळपत्या ऊन्हात त्या बाप-लेकाचीं प्रेतांच्या आग्नीचे लोट उठत होते
           
         नागेश शेषराव टिपरे
        मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
        मो.नं:-८६००१३८५२५

विजय वाठोरे सरसमकर

नागेश सर    लई  भारी  लिखाण आहे आपल ...
लेखक आणि कवी .... मस्तच जुळतंय तुमच ..