मैत्री

Started by Shrikant R. Deshmane, August 07, 2016, 11:53:04 AM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane



पावसाला ही माहितीये,
तुझं माझं नातं,
भिजवुन टाकतोय मैत्री,
तुझ्या माझ्या मनातं...

विज असता साथीला,
साद देते आतुन,
मैत्रीची सुरवात होऊदे,
तुझ्या माझ्या हातुन...

ओली झाली पाने-वेली,
सजु लागली धरती,
आयुश्यात एक वाट मिळावी,
तुझ्या माझ्या जिवावरती...

आसुसलेलं मन मातीचं,
पावसानं विझवलं,
आयुश्याच सारं दु:ख,
आपल्या मैत्रीने भिजवलं...

वारा ही सोबत देतो,
मातीचा गंध पसरायला,
मैत्रीची भांडने मग,
हळुच लावतो विसरायला...

बरसत राहा खुप,
नात्याचा भरुदे काठ,
ओसंडून वाहन्याआधी,
मैत्रीची मिळूदे साथ...

श्रीकांत रा. देशमाने.
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]