***** तू गेल्यापासून *****

Started by Shri_Mech, August 08, 2016, 11:49:44 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

तू गेल्यापासून


एकटं एकटं राहणं
विसरायचं नाटक करणं
सगळं संपवावंसं वाटणं
अन त्यातही अपयशी होणं....


दिवसभर हुंदडणं
मधेच, कॉलेजकडे फिरकणं
कट्ट्यालाच घर बनवणं
फक्त झोपायलाच घरी जाणं....


नाक्यावरचा कटिंग चहा
'गणेश' मधली भजी
रात्री एखादी सिगरेट
अन मित्रांची बडबड ऐकणं...


इतरांचा जल्लोष पाहून
जुने दिवस आठवणं
उगाच मनात हसणं
अन येणाऱ्या अश्रूंना रोखणं.....


प्रयत्नाचे डोंगर
मनाची समजूत
घोटभर दिलासा
आणि अंधुकशी आशा.....


तू गेल्यापासून असं विस्कटलंय बघ सगळं.....!!!



टीप:
मी काही दिवसांपूर्वी अभिराज बोस दिग्दर्शित 'Interior Café Night' ही shortfilm पहिली. मला खूप आवडली. विषय जुना आहे पण कथेची मांडणी सुरेख आहे. त्या shortfilm ची link मी share करतोय, जर आपण ही shortfilm पहिली नसेल तर नक्की पहा, ती आपल्याला जरूर आवडेल.

https://www.youtube.com/watch?v=23KufSqo6cQ


Shri_Mech
Shri_Mech