नाशिक १० मे २०१५

Started by swara, August 09, 2016, 09:09:02 PM

Previous topic - Next topic

swara

पहाटे ५ चा अलार्म जसा वाजला तशी भराभर उठून तयारी केली. आई पप्पांना काहीतरी भलत कारण दिल होत. गावच्या घरच बांधकाम चालू होत म्हणून आई पप्पा दोघेही गावाला होते. आणि ताई तेव्हा पुण्याला जोब करत होती. मी जशी तयारी झाली तशी बाहेर पडली. १ रात्र अन दोन दिवसासाठी जे जे काही लागणार होत ते भरभर bag मध्ये असच कोंबल होत. तो आणि अमोघ दोघेही माझ्या घराजवळ मला घ्यायला आले होते. त्या दिवशी अमोघसोबतची माझी पहिली भेट, आम्ही  त्याच्याच नाशिकच्या घरी जाणार होतो. जस मी त्याला पाहिलं धावत रोड क्रॉस केला. अमोघसोबत ओळख झाली आणि लगेचच निघालो. आता सचिन , मयू, मिथिल   आणि सुजा आम्हाला भेटणार होते आणि तिथून आम्ही एकत्र जाणार अस ठरलं. जस आम्ही पोहोचलो मी माझ्या best frnd मयुला शोधत होती, ofc मुळे तो येऊ शकला नाही. सगळ्यांचा mood ऑफ झाला. आपला संपूर्ण group आणि त्यात एखादा जरी नसेल तर मज्जा सगळी निघून जाते. मी सहजच माझा mobile चेक केला पाहिलं तर ताईचे ४-५ misscall  येउन गेलेले. रविवारी minti ताईच लग्न होत. खूप जवळच नात आमच्यात. ते सोडून मी माझ्या friends सोबत बिन्दास्त फिरायला आली होती. ताई ला शेवटी समजलच कि मी नाशिकला जातेय वेगेरे... चांगला अर्धा तासाचा ओरडा संपल्यावर, माझा रडण्याचा प्रोग्राम संपल्यावर आम्ही निघलो. जातानाच माझा असा मूड ऑफ बघून सगळेच शांत झाले. पण मग नंतर ... याच  tension थोड्या वेळाने उडून  गेल :D .... सोनू तिथे नको जाउस पडशील... सोनू बघ ... सोनू हे ... सोनू ते ... मला चिक्कार हसायला येत होत कारण मी त्याला पहिल्यांदा अस वेगळ्या नावाने हाक मारत होती. मग दुपारच जेवणसुद्धा झाल ...अस करत करत  finally नाशिक पोचलो.... bags वेगेरे घेऊन आम्ही अमोघच्या घरी आलो.
      आम्ही आमच्या bikes काढून फिरायला निघालो. नाशिक हे खूप सुंदर शहर , आमच्या आठवणी पण तितक्याच गोड राहिल्या.
      सगळ आवरून आम्ही गाद्या घातल्या. सोफ्यावर मिथिल, गादीवर मी, मग हा , अमोघ , सचिन , आणि सुजा असे एकानंतर एक झोपलो. lights ऑफ केल्या मला उशीची सवय नाही, म्हणून मी अशीच गादीवर पडली. माझ्या बाजूला त्याच्या असण्याने खूप फरक पडत होता. १६ वर्षांची शुद्ध मैत्री कदाचित वेगळ वळण घेणार होती ... मी थोडस सरकून त्याच्या अगदी थोड्याच अंतरावर झोपली होती, त्याने त्याचा उजवा हात किंचितसा पुढे करून माझ डोक उशीप्रमाणे हातावर तोलल. त्याच्या हाताची उशी करून मी माझ्या कुशीत डोळे बंद करून झोपू लागले .  काही न कळताच त्याच्या इतकी जवळ आली कि याआधी कधीच नव्हती. त्याचा श्वास आणि माझा श्वास इतक्या  जवळून आम्ही पहिल्यांदा अनुभवत होतो. मी या वेळेस त्याच्या आणखीन जवळ गेली , त्याचे ओठ माझे ओठ इतके जवळ होते कि वाटल ......... माझ्या डोक्यात काहीतरी अचानक विचार येउन मी झटकन मागे झाले. तो मला एकही शब्द बोलला नव्हता. हे सगळ कदाचित तोही तितक्याच नवेपणाने अनुभवत असावा. अस मी दोनदा केल. i mean मी पुन्हा एकदा त्याच्याजवळ येउन मागे सरावली होती. आता हि माझी तिसरी वेळ कि मी त्याच्या जवळ गेली इतक्या जवळ की तो सुद्धा गोंधळून गेला... मी काही केल्या, मागे सारण्यासाठी खूप मनाशी भांडत होती पण मी काही स्वतःला थांबवू नाही शकली. तो तसाच माझ्या जवळच होता. मी इतक्या जवळ आलीय अस कदाचित त्याच्या लक्षात आल असाव म्हणून लगेचच माझ नाव घेतल.... थोड्या वेळासाठी तिथेच थांबली आणि भानावर आली. आमच्या इतक्या निखळ मैत्रीमध्ये अस काही घडेल याचा लवलेशही नसताना हे सार घडत होत. मी झटकन मागे झाली आणि मग पुन्हा जवळ गेलीच नाही. हे काय घडल वेगेरे काहीच विचार नाही आले...तो तिथून निघून खिडकीपाशी गेला एक cigarette पेटवली. मी उगाचच लक्ष नसल्यासारखं केल पण मनात खूप अस्वस्त होते. वाट पाहत होते कि कधी हा पुन्हा येईल पण तो आलाच नाही ......     मग मला कधी झोप लागली समजल नाही         
      सकाळ झाली माझी नजर त्यालाच शोधत होती. खूप वाट पाहिली, तो आता येईल मग येईल अस करता करता सगळेच उठले. न राहवून मी फ्रेश होण्याच्या निम्मित्ताने उठले तो बेडरूम मध्ये झोपला होता.... खर तर त्या रात्री तो झोपलाच नाही अस कळल. मी टॉवेल घेण्यासाठी बेडरूम मध्ये गेली.... ना तो बोलला ना मी ... मला त्याच्याशी बोलायचं होत....  खूप काही .... तो न बोलण्याचा अर्थ समजत नव्हता. हे सगळ नशेत झाल असल तरी नशा गेल्यानंतरही तो मला तितकाच हवा होता जितका काल...कदाचित त्यापेक्षा जास्त ... .  शेवटी न राहून मीच त्याच्याशी बोलली. आणि मग तोही सगळ्यांसमोर काहीच नाही झाल्यासारखं माझ्या प्रश्नांची उत्तर देत गेला. मला अजूनही समजत नव्हत कि हि इतकी सुंदर गोष्ट त्याच दिवशी विसरायची कि पुढे .......... माहित नव्हत काहीच कळत नव्हत. मी माझा मित्र गमावला तर नाहीना याची इतकी भीती याआधी कधीच नव्हती वाटली.... पण त्यावर आता काहीच बोलायचं नाही अस ठरलं. ते क्षण जगत होतो ... दोघेही surprise होतो ... कोड्यात होतो . ... commitment, affair यातली कोणतीही गोष्ट न ठरवता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.

vinayak_Sable

विनायक साबळे
Mob-: 9860402399