नाती ........

Started by विजय वाठोरे सरसमकर, August 14, 2016, 04:56:39 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर

नाती ........

नाती जोडण्याची किमया हि न्यारी
क्षणात दु:ख नि क्षणात सुख सारी

कधी बनाव लागतं दिव्याच्या वाती
झुगारून बंधना बनाव लागत जीवनसाथी 

खळखळत्या पाण्यासम मोहवते हि कहाणी
मग नाती जपण्यातच सरून जाते ही जवानी


नसते रूढी आणि परंपरांच्या गुंत्यांची जाण
असते ती फक्त हृदयीच्या स्पंदनांची आण

बनून धीर कधी बनून प्रेरणा
अंतरीचा दिलासा तर कधी करते प्रतारणा

या नात्यांच्या दुनियेत मोठा ना लहान
जपलेली नाती असतात सदैव महान


                                      कवी :- विजय वाठोरे सरसमकर
                                           ( साहिल )   
               हिमायतनगर जि.नांदेड
               मो.न.९९७५५९३३५९