प्रेम कविता

Started by Amol k. Chim, August 15, 2016, 01:32:22 PM

Previous topic - Next topic

Amol k. Chim

दूर जाताना तुला पाहिले
मन माझे तुटत राहिले,
काय चुकले असे माझे
तू एकदा न मागे वळून पाहिले.

यातनेचे मन माझे
आठवणीत जळत राहिले
वेचतना तुकडे अन्तकरनाचे
हातून दूसरे पडत राहिले.


भटकत डोळे माझे सर्वत्र
तुलाच सदैव शोधत राहिले
पाहिलेत का प्रेमाला माझ्या
शब्धात फ़क़्त प्रश्न राहिले.


शोधून शोधून तुला आता
मन माझे बसून राहिले
का गेलीस दूर इतकी
स्वतःशीच भांडत राहिले.

.by - अमोल चिम
from-  निमकवला (खामगाव ) 8605076572