Poem for All gents/Brothers/Fathers

Started by priya_kulkarni, August 16, 2016, 08:24:13 PM

Previous topic - Next topic

priya_kulkarni


थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही



आई म्हणे मला साडी,
बाबा म्हणे मला काशी,
ताई म्हणे मला का काहीच नाही,
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही

माता पिता सेवा करू की,
संसाराला मेवा चारू.
बहिनीच्या गळ्यात,मोत्याची का माळ घालू,
बाहुलीच्या लग्नाला पैसा कुठून जमवू.
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही

सेवा करीत करीत वय आता सरिले,
बहिनीचे माहेरपण ,अजुन काही उरीले.
संसाराची ओढाताण,आता काही संपिली,
बायाकोची हौस-मौज,करायची राहिली
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही

माझ्या या नराला ,ना  माहेरची माया,
माझ्या या नराला,ना सासराची छाया,
माझ्या या नराला ,नाही आला कुठुंनी सांगावा,
बायको म्हणे आता ,कुठे गेली ती  माया,
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही

बाहुलीचे लग्न झाले,मुलाला काहीच न उरले,
माइया या मुलाला विसावा आता कुठेच नाही,
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही



Poem by   प्रिया कुलकर्णी /बीडी

Priya-Kulkarni

THAKALELYA NARALA WISAWA ASA KUTHECHA NAHI