***** पुन्हा परतणे नाही *****

Started by Shri_Mech, August 16, 2016, 11:55:18 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

पुन्हा परतणे नाही


यावी पुन्हा धुंदी
विस्मृतीत गेलेली
ती तशीच हसावी
मला बेहोष करण्यासाठी


पुन्हा तो काळ परतावा
प्रेमाचा उत्सव साजरा व्हावा
तिच्या नुसत्या असण्याने
चैतन्याचा सळसळाट व्हावा


तिच्या अस्तित्वाचा गंध
पुन्हा दरवळून उठावा
त्या मुग्धतेला मोहून
मी बगीचा पालथा घालावा


बेफाम घोड्यासारखा
तिच्या भावनांचा आवेग
बरसवतो श्रावण सरी
तो आठवणींचा ढग


ताबा न राही आता
लेखणी सुसाट धावते
तुझ्या वर्णनाने
भरून वाहती उतारे


खरंच, काय दिवस होते
भुर्र्कन संपून गेलेले
आपल्या गप्पांच्या ओघात
वेळेला मागे टाकणारे


एकच गोष्ट मन खाते
जाणीव जीवाला टोचते कि,
ते मोरपंखी दिवस
पुन्हा परतणे नाही


Shri_Mech
Shri_Mech

vikrams13

Vnsarak