नाती तुटताना १

Started by NageshT, August 17, 2016, 12:30:07 AM

Previous topic - Next topic

NageshT

नागेश टिपरे लिहितोय.....
      नाती तुटताना

            सुर्य उगवुन कासरा भर वर चढला होता. राजु आजुन ही झोपेतच मरगळत होता. आईने दहा-बारा हाका मारल्या नंतर त्याने हात पाय तानत गोधडी सोडली अन पडवीत येऊन बसला. तो बसतो का नाही तो पर्यंत त्याच्या म्हतारीने तोंडाचा पट्टा चालु केला. राजु सर्व काही शांत पणे ऐकुन घेत होता त्याला याची जणु काय सवयच लागली होती. म्हतारीची बरीच बडबड करून झाल्या नंतर त्याची आई शारदा त्याला म्हणाली
"दत्तु आला व्हता तुच्याकडं; जाऊनंशानी बघ पोर काय म्हणतयं ते" यावर राजु ने बसल्या जागी मन डोलावली.
     तसे पाहीले तर दत्तु हा गणपतराव व बकुळाचा एकुलता एक पोरगा. शाळेमध्ये तो हुशार होता, गरीबी आसताना ही मॉट्रिक ची परीक्षा दिली होती. दुसरी गोष्ट म्हणजे दत्तु अन राजुची दोस्ती गावभर प्रसिद्ध; कधी ही त्याच्या दोस्तीत फुट पडली नाही अन पडायची पण नाही आशी काही गावभरातील म्हतारी-क्होतारी ग्वाही द्यायचे.  यात तीळमात्र शंका नव्हती. गावभर यांची दोस्ती तोडण्यासाठी पैंजावर पैंजा लागायच्या त्यात आता पर्यंत कोणी ही यशस्वी झाले नव्हते. त्याचा परीणाम त्या दोघांवर कधी ही दिसला नाही. पुढे दोघांचा मॉट्रिक चा निकाल झाला, दोघेही चांगल्या गुणांनी पास झाले होते. याच्या खुषीत पाटलांनी गावभर पेढे वाटले, राजु हा पाटलाचा तर दत्तु पाटलाच्या शेतावर काम करणाय्रा गड्याचा पोर. तस पाहीलं तर गणपतरावची परिस्थिती जेमतेमच होती. पाटलांच्या सांगण्यावरून दत्तु ला पण राजु बरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवायाला गणपतरावाला  सांगीतलं. पाटलांनी तशी दोघांची सोय ही केली होती.
          पाटला मुळे दत्तुच पण शिक्षण चालु राहिलं होत. दोघे ही नविन ठिकाणी रमत होते, हळुहळु त्यांच्या मैत्री ची खबर सर्व महाविद्यालयाला कळु लागली. कॉलेज चे ते दिवस असेच सरत होते. या दिवसात त्याची ओळख त्याच्या वर्गातील नंदिनी शी झाली. नंदिनी दिसायला सुंदर होती.
तशी तर ती सडपातळ बांध्याची, त्यात तिने घातलेल्या गुलाबी ड्रेस मध्ये ती अधिकच उठुन दिसायची. दोन भुवयांच्या मधोमध लावलेली ती नाजुकशी टिकली अनं डाव्या गालावर येणारी ती केसांची बट्ट. या सौंदर्यात जणु स्वर्गातुन परीच धरतीवर उतरावी आसा तीचा भासत होत होती.
क्रमश.....

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५