नाती तुटताना २

Started by NageshT, August 17, 2016, 12:34:00 AM

Previous topic - Next topic

NageshT

तीची मैत्रीण म्हणे तिचा बाप बँकेत साहेब आहे. दत्तु व राजु ची नंदिनीशी हळुहळु मैत्री वाढु लागली होती अनं तीला ते दोघे आपले सर्वात जवळचे मित्र वाटु लागले होते. काही दिवस आशेच गेले अनं त्या काळात नंदिनी ला दत्तु बद्दल थोडं जास्तच आकर्षण वाढु लागलं होतं. इकडे दत्तु ची पण अवस्था नंदिनी सारखीच झाली होती. एके संध्याकाळी चहाच्या टपरीवर चहा घेत असताना दत्तु चिंत्ता ग्रस्त वाटत होता म्हणुन राजु ने त्याला त्याच कारण विचारले. काय सांगव, कसं सांगाव या द्विधा आवस्थेत पडला.
राजुने जोर दिल्याने तो चाचपरत बोलला
"मला नंदिनी खुप आवडती यार राजु"
त्याच्या या बोलण्याने त्याचा ही चेहरा खुलला.
'मला प्रेम झालेल पाहुन जगात सर्वात जास्त आनंद कोणाला होईल तो राजुला' असे दत्तु वाटत असे; अनं का वाटु नये. त्याने जसा विचार केला होता त्या पेक्षा जास्त आनंद राजुला झाला होता. तो स्पष्ट पणे राजु च्या चेहय्रावर जाणवत होता. हातातील चहा कधी संपला ते त्या कळले सुध्दा नाही, दोघे रमत गमत आता घराची पावले चालु लागले. नंदिनीला नंदिनी म्हणण्या ऐवजी वहिणी वहिणी म्हणु चिडवु लागला. त्याच्या त्या बोलण्याने दत्तु पण थोडा भावनीक झाला. दोघांची स्वारी आता घरी पोहचली पण हुल्लंड पणा काही गेलेला नव्हता. रात्री बोलण्यास त्यांना एक नविन विषय मिळाला होता.
     तिकडे नंदिनी ही प्रत्येक गोष्टी साठी दत्तु च्या नावाचा जप करत आसायाची, कधी कधी झोपेत पण त्याच्याच नावाने चावळायची. दिवसा मागे दिवस जात होते अनं दोघेही एकमेकांना आपल्या प्रेमाचा प्रस्ताव मांडण्यास भीत होते. एके दिवशी दुपारच्या वेळेला या तिघांची स्वारी कॉलेज कॉंटिन मध्ये बसली होती. चहाची ऑर्डर देण्यासाठी राजु आत गेला होता अनं बाहेर दत्तु नंदिनी कडे एकटक पहात होता विचार करत होता
*एक ऊमलावी कळी नभातुन कोसाळाव्यात सरी चिंब भिजावी मनाच्या तरी  त्यात दिसावी माझी परी*
यातच राजु च्या येण्याच्या चाहुलीने दत्तु भानावर आला. दत्तुची ती नजरेची भावना नंदिनी ने कधीच ओळखली होती. चहाचा कर्यक्रम उरकुन राजुने आपला काढता पाय घेतला व त्या दोघांना थोडी मोकळीक करून दिली. राजुच्या जाण्याच कारण नंदिनी ला ओळखु आल होतं. हाजारोंच्या पट्टीत विद्यार्थ्याच्या समोर बोलनारा दत्तु आज मात्र आडखळत होता. तो दिवस ही तसाच गेला पण तो नंदिनी ला बोलण्यासाठी हिमंत जुटवु शकला नव्हता.
            दिवस हळुहळु मावळतीकडे झुकु लागला नंदिनी चा निरोप घेऊन राजु व दत्तु घराकडे चालु लागली. नंदिनी ला आपण विचारण्याची हिमंत करू शकलो नाही याची नाराजी साफ साफ दत्तु च्या चेहय्रावर पाहुन विषयंतर करून बोलु लागला. नविन विषयावर दोघांची चर्चा सुरू झाली. त्या रात्री राजु ने त्याला खुप समजावलं नंदिनी ला प्रेमाचा प्रस्ताव मांडण्यासाठी त्यानी एका दिवसाची निवड केली.
       आखेर ज्या दिवसाची ते दोघे ही आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस उजाडला. दोघांनी पटापटा उरकले आणि कॉलेज ची वाट चालु लागले. दत्तुच्या तोंडावर एक वेगळ्याच प्रकारच भितीच सावट दिसत होतं. यातच दोघे शेवटच्या बाकावर बसले. मनात नाना प्रकारचे विचार येत होते. वाय्राची झुळुक यावी अनं निघुन जावी तशी कॉलेज ची वेळ निघुन गेली. कॉलेज सुटले प्रत्येक जण वर्गाच्या बाहेर पडत होता. दत्तु अजुन शेवटच्या बाकावर बसुन राहिला होता. हे पाहुन साहजीकच नंदिनी ही मागे रेंगाळु लागली. दत्तु च्या शेजारी राजु ही आजुन तसाच बसलेला होता. हळुहळु सर्व वर्ग पुर्णपणे रीकामा झाला. सर्वात शेवटी राजु ही वर्गाच्या बाहेर पडु लागला. जाताना हळुच तो दत्तु च्या कानात पुटपुटला
"आज तु वहिणीला विचारलेच पाहिजे नाही विचारणार तर तुला आपल्या मैत्रीची शपथ"
असे बोलुन तो जीना उतरू लागला. त्याचा जीना उतरताना होणारा आवाज दत्तुच्या काळजावर घाव करीत होता, हळुहळु जीन्यातुन येणारा आवाज मंदावत गेला. काही क्षण राजुच्या त्या बोलण्याने दत्तुचे डोळे पाण्याने डबाबले. राजु निघुन जाऊन बरीच वेळ झाली होती. एकांत पाहुन नंदिनी त्याच्या जवळ येऊन बसली व म्हणाली
काय रे! काय झालं; डोळे का पाणावलेत तुझे.
काही नाही गं, असचं.
म्हणुन त्याने डोळे पुसले.
त्याच्या मनावर आता एक प्रकारच दडपण होतं कारण राजुची शपथ क्षणा-क्षणाला आठवण करून देत होती. काही वेळ गेला त्या दोघांच्या गप्पा रंगु लागल्या. वेळ ही भरभर निघुन चालली होती. सुर्याची तीव्र किरणे हळुहळु मंद होऊ लागली. दत्तु आद्याप  मुख्य विषयाला हात घातला नव्हता. नंदिनी घरी निघण्याची तयारी करू दरवाज्यापाशी आली होती. आशातच दत्तु ने पुन्हा तीली आवाज दिला.
क्रमश........

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५