नाती तुटताना ३

Started by NageshT, August 17, 2016, 12:39:45 AM

Previous topic - Next topic

NageshT

नंदिनी....
सावकाश पावलांनी ती जवळ येऊ लागली, ती जवळ येताच दत्तुने आपल्या मनातला भाव टाकला
    नंदिनी!!!!
    बोल ना; का रे
    रागवणार नसशील तर एक बोलु
    हो बोल ना
    नाही, पण.....
    पण बीन जाऊ दे! बोल
    तु मला .....
    काय? तु मला
    तु मला खुप आवडतीस, मी प्रेम करू लागलोय तुझ्यावर!!!
दत्तुच्या या बोलण्याने ती थोडीशी लाजली, तीला काय बोलाले ते ही कळना.
      छे! ऱे!! नको हे(लाजुन)
म्हणुन तीने पाठ फिरवली
दत्तुने तोपर्यंत तीचा हात पकडला होता.
त्याच्या हातातुन हात मोकळा करून ती पळतच दारात पोहचली, मनातील आनंदाने ती हर्षीत झाली होती. दरवाज्यात क्षणभर थांबुन लाजुन तीने होकार्थी इशारा केला, पळतच जीणा उतरू लागली.
      नंदिनी, नंदिनी! थांब ना!
मागुन दत्तुने आवाज दिला;  पण ती काही थांबली नाही.
नंदिनी पळत जाताना पाहुन खाली उभा आसलेल्या राजुच्या मनात शंकेच वावटंळ उठु लागलं. तो पळतच दत्तु कडे धावला त्यांची भेट जीण्यामधेच झाली. राजुला बघताच दत्तुने त्याला मिठी मारली, प्रेमाने त्याचे डोळे भरून आले होते. इकडे राजुच्या मनाची घालमेळ आजुन सुरूच होती.
दत्तुचा चेहरा दोन हातात धरून राजु बोलला.
     दत्तु! ये दत्तु! काय झाल....काय म्हणाली नंदिनी
दत्तुने पुन्हा एकदा राजुला मिठी मारली.
हो म्हणाली यार! नंदिनी हो म्हणाली
दत्तुचे हे शब्द ऐकताच पुन्हा एकदा दोन यार ऐकमेकांच्या मिठीत बिलगली. घरी जाण्यस आज त्यांना बरीच वेळ झाली.
                 हसी- मचाक मध्ये काही दिवस निघुन गेले, दिवाळी लोटली. दत्तुला जमेल तेवढा वेळ दोघांबरोबर घालवण्याचा प्रयत्न करायचा.
त्याच्या प्रेमात राजु जेवढा हक्कदार होता तेवढीच नंदिनी ही होती; हे त्याला कळुन चुकले होते, त्या सत्या पासुन तो पाठ फिरवु शकत नव्हता. कधी तो राजु बरोबर असेल तर नंदिनीनीला वाईट वाटु लागायचे, तर कधी नंदिनी बरोबर असेल तर इकडे राजुला त्याच्या कमतरतेची जाणिव व्हायची; अनं तो कधी भावनाधीन व्हायचा तर कधी कधी त्याला रडु ही कोसळायचे. जशी जशी नंदिनी त्याच्या जवळ येत गेली तसातसा मी त्याला दुरावत गेलो या गैरसमजात राजु राहु लागला. या दोघांच्या मनाची जाणिव दत्तुला पण होऊ लागली, अनं यांच्या विचाराने तो तीळतीळ तुटु लागला व रात्र रात्र जागु लागला.
          राजु कधी एकटा दिसला की इतर मित्र-मैत्रिणी त्याला समजुन सांगायचे पण त्याने राजु काही समाधानी होत नसायचा. पण ज्या दिवशी तिघे ही एकत्र बसायचे, फिरायचे, गप्पा मारायचे त्या दिवशी सगळ्यात आंनदी होत आसेल ती व्यक्ती म्हणजे दत्तु असायचा. आपला मित्र, आपलं प्रेम, आपल्या बरोबर आहे या गोष्टीने तो आधिकच समाधानी व्हायचा. त्याच्या या हासण्यात, रूसण्यात व भांडनात हिवाळ्याचे चार महिने कसे निघुन गेले हे त्यांना कळले नाही.
           पण जशी जशी उन्हाची तीव्रता वाढु लागली तसातसा राजु व नंदिनी यांच्या  मधला दत्तु साठी होणारा तणाव वाढतच गेला. दत्तु काही कामासाठी बाहेर गेला असेल तर नंदिनीला वाटे आपल्या पेक्षा त्याला राजु प्रिय आहे व राजुला वाटे त्याला फक्त नंदिनीच आवडते. परत दत्तुने किती वेळा तरी समजवण्याचा प्रयत्न केला तरी दोघे ही एकुन घेण्यास तयार नसायचे. राजु व दत्तु मध्ये अंतर पडु लागले होते, याला संपुर्ण जबाबदार ही नंदिनी आहे या गोष्टी वर राजु ठाम होता. यांच्याच कॉलेज मधली काही उर्मट पोरं याचा फायदा घेत होती, व त्याच्या मैत्री मध्ये अंतर पाडत होते.
        वार्षिक परीक्षा तोंडावर येऊन ठेपल्या होत्या, प्रत्येक जन आपआपल्या अभ्यासात मग्न झाले होते. काही काळापुर्वी तिघांच्या मैत्रीत आसणाय्रा एकोप्याचा मात्र समद्विभुज त्रिकोन झाला होता. परीक्षा ही संपली, दत्तुने शेवटच्या दिवशी दोघांना एकत्र बोलावले. या दोघांच्यात सामंज्यस्य आणण्यात दत्तु पहिल्यांदाच आपयशी ठरला होता. शेवटी नंदिनी ने आपल्या मनातील मनसुभा बोलवुन दाखवला.
        "तुला राजु हवा असेल तर तु मला विसरून जा नाहीतर तु माझ्यासाठी राजुला विसर"
तिच्या या बोलण्याने तो पुरता कोसळला होता. तो पर्यंत नंदिनी निघुन ही गेली होती. दत्तु व राजु आता घराकडे निघाले, रकरकत्या उन्हात दोघे ही घरी पोहचले, सुर्य ही ढळुन गेला, रात्रीच जेवन सुध्दा झाल पण कोणीही काही बोलत नव्हते.
  क्रमश..........

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५