नाती तुटताना ४

Started by NageshT, August 17, 2016, 12:42:10 AM

Previous topic - Next topic

NageshT

दुसरा दिवस उजाडला, दत्तुच्या जीवाचा होणारा आटापीटा राजुला आता बघवत नव्हता, त्यातच त्याली कालचे ते नंदिनीचे शब्द आठवले. दत्तुच्या प्रेमासाठी आपण दत्तुच्या आयुष्यातुन निघुन जावे असे राजुला वाटु लागले. राजु दत्तुला घेऊन बस स्टॉंड जवळील वळणावर आला, सुर्याच्या तळपत्या उन्हात अंगाची लाहीलाही होत होती. तेवढ्यात नंदिनी ही आली. तिघे ही अनओळखी माणसा सारखे एकमेंकाडे पाहत होते, शेवटी काळजावर दगड ठेऊन राजु बोलु लागला.
मला महित आहे माझं चुकलं आहे; मी तुमची माफी ही मागु शकत नाही, मी तुमच्या खाजगी आयुष्यात येण्यास नको होतं. हे बोलताना राजुच मन भरून आलं हे नंदिनीला स्पष्ट पणे जाणवले होते. शेवटी तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे म्हणुन त्याने दत्तुला मिठी मारली. क्षणातच तो भानावर आला अनं बाजुला सरला न डबाबलेले डोळे पुसत, काही न बोलताच निघाला. नंदिनीनीला ही आपल्या चुकीचा चांगलाच पश्चाताप होऊ लागला. राजु व दत्तुच्या मैत्री तुटण्याला ती स्वतःला जबाबदार धरू लागली. ती दत्तुकडे एकटक बघत होती, डोळ्यातुन आपआपच धारा वाहु लागल्या. नंदिनी काहीच बोलली नव्हती पण तीच्या सर्व भावना दत्तुला उमजल्या होत्या. नंदिनी ही तशीच निघुन गेले.
दत्तु आता दुरवर दोन वेगवेगळ्या दिशेला जाणाय्रा त्या पाठमोय्रा आकृतीकडे पहात होता. आपण पोरके झालेल्या भावनेने दत्तुच्या डोळ्यातुन आश्रु वाहु लागले होते. चैत्र महिन्याच्या त्या उन्हात आसु विरून गेल्याने त्याची जाणिव सुध्दा होत नव्हती....

नागेश शेषराव टिपरे
मु.पो:-खडकी ता.दौंड जि.पुणे
मो.नं:-८६००१३८५२५