आजोबा

Started by scooby, August 18, 2016, 01:25:25 AM

Previous topic - Next topic

scooby

#आजोबा#
।।आयुष्य कस जगावं अणि जगु द्याव हे तुम्ही शिकवला
माणुस कसा असावा आणि माणुसकी कशी असावी
हे तुमच्याकडून कळाल..।।

इवल्याश्या या बोटाना
तुम्ही दिला आधार
सोडून गेला तुम्ही
झालो मी निराधार
टाकले मी जेंव्हा पाऊल पहिले
होता तुम्ही बरोबर
आता आला आहे धीर
पण तुम्ही सोडून गेला खरोखर....

लहानपणापासुन तुमच्या
अंगा खांद्यावर खेळलो
बाबा मारायला आल्यानंतर
तुमच्या कुशीत दडलो
तुम्ही मला चुकवुन कोल्हापुरात गेला
तर खुप वाईट वाटायचा
पण खायला घेउन आल्यानंतर
भानच हरपून जायचा....

अजुनही मला आठंवतय
एक रुपयासाठी तुमचे पाय चेपुन द्यायचो
मिलालेल्या पैश्याचा गारेगार खायचो
रोज़ सकाळी उठल्यावर तुमच्या कड़े जायचो
निरागस चेहरा करून बिस्कीटचा पूडा मागयाचो
गरमगरम कांदा भजी तुम्ही
माझ्यासाठी घेउन यायचा
बेत असायचा माझा सगळा
एकट्यानेच संपवायचा......


खुप सुंदर होत्या त्या आठवणी
खुप मोहक होते ते क्षण
तुमची सोबत असताना
कायमच हरवायाचे मन
तुम्ही दाखवलेल्या वाटेवरून
मला चालायच आहे
तुम्ही दिलेल्या शिकवणीतुनच
मला शिकायचा आहे
आणि सगळयांना सांभाळता सांभाळता
हे जग सुद्धा जिंकायचे आहे...

कारण

।।आयुष्य कस जगावं अणि जगु द्याव हे तुम्ही शिकवला
माणुस कसा असावा आणि माणुसकी कशी असावी
हे तुमच्याकडून कळाल..।।

शुभम (kolhapur)-
shubhammiraje3141@gmail.com