बडबड गीत

Started by sanjay limbaji bansode, August 18, 2016, 11:19:36 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

*********बडबडगीत ********
खास माझ्या मुलाची फर्माईश
(नेवील संजय  बनसोडे )

माणूस पेरलं गाढव उगवलं
कुत्र्याला फुटलं सींगं
वाघ झाले मेंढरं नं
कोल्हा मागतोया बाशिंगं !

काळरान सारं नापीक झालं
पडीकात उगवलं धानं
कोकीळा  झाली बेसूरी
अन् कावळा गातुया गाणं !

घूबड फुलवी पिसारा
अन् मोर जागे रातीला
शेळी  करी कोल्हभूकं
लांडगा फिरे तिच्या साथीला !

वानर सारे जमिनीवर पळती
अन् हरिण चढ़े झाडावरं
भुईमूग आला तूरीला
अन् नारळ दिसे ताडावरं !

गाय जुंपली औताला
अन् बैल देई दूधं
मधमाशा झाल्या नाजुक
फुलपाखरे काढती मधं !

संजय बनसोडे