त्या निळ्या सागराच्या....

Started by sanjay limbaji bansode, August 18, 2016, 11:25:26 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

माज मी पणाचा आला अन् वाटा विभागल्या
त्या निळ्या सागराच्या मंग लाटा विभागल्या !

जाऊ कुठे कळेना, दिसती आपलेच  येथे
स्वार्थासाठी आपुल्या शेपूट हलवणारे नेते

पेटताक्षणीच विझली,ती भीमक्रांतीची आग
लांडगे होऊन उष्ट खाती,आपलेच येथे वाघ !

मी मोठा तु छोटा,साबित करण्यात गुंतले
दुसऱ्याशी घरोबा करुनी, बापावरीच भुंकले !

इकट्ठा होण्या आधिच,इथल्या नोटा विभागल्या
त्या निळ्या सागराच्या मंग लाटा विभागल्या !

भीमकवी संजय बनसोडे
http://bhimlekhani.blogspot.com