माणुसाच गाणं

Started by Balaji lakhane, August 20, 2016, 10:30:55 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

माणुसाचं गाणं...

रडतांना येतो,जगतांना रडतो,
आयुष्यभर रडण्याचं गाणं गातो...

जगण्यासाठी कधी पडतो झडतो,
लबाड्या करुन,मानसा तु जगतो...

लाजहि सोडतो कधी लोभापाई,
कुत्र्यापुढे फिके तुझे ईमानही...

गाढवानेही तुझ्यामुळे खाली पहावे,
त्याचे नाव तु स्वत:स का लावावे...

माणुस म्हणुनी जग,पशु नको होऊ,
सन्मार्गाने चाल,भरकटून नको जाऊ..

कमलेश शिंदे
कानडगांव
९१६८६८४६६४