डोळे............

Started by VIRENDRA, January 01, 2010, 05:33:54 PM

Previous topic - Next topic

VIRENDRA

मी रेल्वेत चढलो तेव्हा डब्यात फक्त एक तरुणी खिडकीशेजारी बसली होती, तिला निरोप द्यायला आलेले एक जोडपे तिला काही सूचना सांगत होते - सामअनावर लक्ष्य ठेव, बाहेर डोकाऊ नको, अनोळखी इसमाशी बोलू नको इत्यादी इत्यादी...आणि ती निमुटपणे ऐकत होती.

गाडीने स्टेशन सोद्लावर मी तिला म्हणालो, "तुम्ही कुठे जाणार आहात ?", माझा आवाज ऐकून ती जरा गोंधळली, तिला वाटला होता कदाचित ती डब्यात एकटीच आहे.... ती सहरांपुरला जाणार आहे आणि तिची काकू नायला येणार असल्याचे तिने मला सांगितले.ऑक्टोबर महिना असल्यामुळे हवेत गारवा होता आणि बाहेर हिरवळ पसरली होती, निसर्गाला उधाणच आला होता जणू....

थोड्या गप्पा झाल्या वर मी तिला ( थोडं  धाडस करूनच - कारण मी अंध होतो...) म्हणालो " तुमचा चेहरा खूप सुंदर आहे.", ती कींचीत  हसली ( असावी)आणि म्हणाली..किती सुन्दर शब्द आहेत " चेहरा खूप सुंदर आहे"....

आता मी पण थोडं सरावलो होतो,मीपण खिडकी बाहेर डोकाऊ लागलो- निसर्गाची शोभा पाहू लागलो..( मला असा वाटत होता कि मी अंधळा आहे हे तिला कळायला नको, म्हणून मी  बाहेर बघत -  बघत    एक निसर्ग वरच गीत गुणगुणू लागलो..), मधूनच तिने केसात माळलेल्या मोगर्याचा सुगंध दरवळत होता..

थोड्या  वेळात तिची उतरण्याचे ठिकाण आले, तिची काकू आली होती... ती निघन गेली...

थोड्या वेळात डब्यात एक इसम चढला.. तो म्हणाला,  " मला माफ करा, आता उतरून गेलेल्या तुमच्या सहा प्रवासी इतका मी आकर्षक नाही ह..."\

मी त्याला विचारले कि, आता उतरून गेलेल्या तरुणीचे केस लांब होते कि आखूड???? "

तो म्हणाला.. " मी तीचे डोळेच पहिले... खूप खूप सुंदर होते ते... पण त्यांचा काही उपयोग न्हवता, बिचारी आंधळी होती...."

( हि मुळ लघु कथा प्रसिद्ध इंग्रजी लेखक रस्किन बॉन्ड यांची आहे.....( The eyes have it ...) सुमारे ३ वर्ष पूर्वी मी पेपर मध्ये वाचली होती तीचे कात्रण बरेच महिने माझ्या पाकिटात होते.... जीर्ण होऊन फाटून गेले.. पण हि गोष्ट आजतागायत माझ्या स्मृतीत आहे...)

 

saru



gaurig


swati121


shashaank

रस्किन बाँडने बहुतेक संपूर्ण आयुष्यात एकाही अंध व्यक्तिबरोबर थोडा काळदेखील व्यतीत केलेला दिसत नाहीये व तरीही एका अंधावर गोष्ट लिहायचे धाडस केले आहे (ज्यात रस्किनसाहेब पूर्ण फसले आहेत).

सर्व अंध व्यक्ति, डोळे सोडले तर बाकीच्या इंद्रियांबाबत (स्पर्श, सूक्ष्माती सूक्ष्म आवाज व गंध) इतक्या सजग असतात की आपण सर्वसामान्य माणसे त्याचा विचारही करु शकत नाही.

रेल्वेच्या त्या बोगीत एक अंध तरुणी आली आहे हे त्या दुस-या अंध व्यक्तिला कळत नाही हा रस्किन बाँडचा पूर्ण पराभव आहे. दोन अंध व्यक्ति एकमेकांची माहिती/ ओळख नसली तरी एका समोरासमोर आल्याक्षणीच एकमेकांना जाणू शकतात (अंधत्वाबाबत). एवढेच काय तर त्या बोगीत - आपल्या आसपास किती मंडळी आहेत - त्यात किती स्त्रिया, किती पुरुष, किती मुले - त्यांचे अंदाजे वय - हे सर्व या दोन्ही अंध मंडळींनी व्यवस्थित ओळखले असणार....... आणि रस्किनसाहेब सांगताहेत की दुस-याच व्यक्तिकडून त्या पहिल्या अंधाला कळते की ती तरुणी अंध आहे .......
लहानपणीच मी एका अंध व्यक्तिला अगदी जवळून पाहिले आहे त्यामुळेच ही धाडसी विधाने करत आहे, कोणाला या गोष्टीतील सत्यता जाणून घ्यायची असेल तर एखाद्या अंध व्यक्तिला ही कथा ऐकवा व त्याचे मत विचारा....

वीरेन्द्र - तुला दोष देऊ इच्छित नाही कारण तुझा हेतू चांगलाच होता पण रस्किनसाहेब या कथेपुरते तरी व्यवस्थित गंडले आहेत हे नक्की.