सावली......!!!

Started by Ashok_rokade24, August 28, 2016, 07:26:03 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

काळोखाची साथ खुप सुखद वाटते,
मनातील भय सारे दूर पळून जाते ॥
काळोख पांघरता सावली नाहीसी होते,
व्यथा चींता दूर होऊन शांती लाभते,
मानापमानाची मनी चींता न ऊरते,
जेव्हा सावली माझी माझ्या सवे नसते॥
तोच निसर्ग पुन्हा नवा वाटतो,
माझा मलाच मी हरवून जतो ,
गीत मनातले ओठांवर येते ,
जेव्हा सावली माझी माझ्या सवे नसते ॥
ऊजळतात पुन्हा त्या आठवणी,
पाहीले जे सुख या नयनांनी ,
दुःखही सारे मन विसरून  जाते ,
जेव्हा सावली माझी माझ्या सवे नसते ॥
शब्द हृदयातील जागे होती ,
हळूवार पणी ओठांवर येती ,
क्षणात काव्य फुलून जाते ,
जेव्हा सावली माझी माझ्या सवे नसते ॥
कोण जाणे कीती काळ ,
कधी अचानक होईल सकाळ,
आठवणीने मन शहारून जाते ,
मग माझ्या सावलीचे मलाच भय वाटते ॥
मग माझ्या सावलीचे मलाच भय वाटते ॥

                                 अशोक  मु. रोकडे.
                                  मुंबई.