बी एम सी चे दहशतवादी अभियान , एका जाणकार आणि मददगार डॉक्टरची हकालपट्टी

Started by siddheshwar vilas patankar, August 31, 2016, 06:34:48 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

नमस्कार

आजची जगण्याची आपली पद्धत कशी आहे ते पहा

पहिला : कसे आहात सर्व ? ठीकच चालले असेल . इतर : जो पर्यंत कोण माझ्यावर बोट दाखवत नाही तो पर्यंत ठीकच आहे, बाबा. शेजारी कसा जळतोय त्यापेक्षा मी कसा पळतोय हे महत्वाचे . कळलं का ?

कालपरवा घडलेला प्रसंग :

आपल्याला माहीत असेलच टी बी मुळे मारणारी दरवर्षी लोक . हा आकडा दरवर्षी दहशतवादामुळे मरणाऱ्या लोकसंख्येपेक्षा निश्चितच मोठा आहे . या विरुध्ध अभियान चालवणारे डॉक्टर ललित आनंदे यांची बी एम सी ने हकालपट्टी केली आहे .
मला हे न पटणारे आहे ? मला वाटत जो माणूस (डॉक्टर ललित आनंदे ) झोपडपट्यानंमध्ये जावून टी बी न होण्यासाठी काय करावे ते करतात , त्याना अडवणे योग्य नाही . मोदीना भारत स्वच्छ करायचा असेल तर हि पध्द्त नव्हे . सर्वानी आताच आवाज उठवला नाही तर हि हुकूमशाहीची नांदी असेल , याची दाखल घ्यावी .
जो माणूस " मे आय हेल्प यु " हा टी बी अवेरनेस कार्यक्रम जागोजागी राबवतो, त्याद्वारे रेल्वेस्टेशन , बस स्टॅन्ड , झोपडपट्टी , गर्दीच्या ठिकाणी ,जागा मिळेल तेथे टी बी न होण्यासाठी काय खावे ,कशी काळजी घ्यावी , आपली रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवावी हे सांगतो त्याची हि अवहेलना म्हणजे त्या ईश्वराशी दगा . जर आपापल्या धर्मात जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे म्हटले असेल, तर मग हे काय ? त्या माणसाला अशी फळ मिळतील याची नक्कीच अपेक्श्या नसेल.
ज्याची दाखल "सत्यमेव जयते" या कार्यक्रमाद्वारे स्वतः आमिर खान साहेबानी घेतली होती त्या माणसाला हा बी एम सी कडून घराचा आहेर.

एक विनंती :

बी एम सी ने हे सर्व का घडले त्याची तपशीलवार माहिती देणे गरजेचे आहे . ती ना दिल्यास जनतेच्या प्रक्षोभास सामोरे जाण्याची दाट शक्यता आहे

सिद्धेश्वर पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C