नेहमीच ती वाट बघायची

Started by abhishek panchal, August 31, 2016, 08:46:25 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

नेहमीच ती वाट बघायची
भेटण्यासाठी मला ,
लवकरच निघायची .

माझं उशिरा येणं ,
आता रोजचंच झालं होतं
तिचं ताटकळत उभं राहणं ,
आता रोजचंच झालं होतं

ना ती कंटाळली ,
ना मी सुधरलो
ती जिंकली प्रेमात ,
मीच कुठेतरी हरलो

काय होतं माझ्याकडे ,
तिलाही ठावूक होतं
माझ्या status पेक्षा ,
तिला प्यारं होतं नातं

ते प्रेम मला कधी समजलंच नाही
आमच्यातलं नातं , मला उमगलंच नाही

तिचं सगळं ठरलं होतं ,
मीच कुठेतरी शंकेत झुरत होतो
दूर ठेवून नातं ,
तिच्या भोवतीच फिरत होतो

हे जग वेडं आहे , कळत होतं तिला
राहून माझ्यासंगे , काय मिळत होतं तिला
प्रश्न घेऊन उरी , रोज भेटत होतो आम्ही
भासत होती मला , त्या नात्याचीच कमी

म्हणून टाळाटाळ उगी , मी सुरु मग केली
नकार ऐकून माझा , ती खिन्न खिन्न झाली

तरीही शांत ती होती ,
बैचेन मीच होतो
पहिल्या त्या प्रेमाचा ,
कधी अंत का होतो

मग धीर करून थोडा ,
ती हसू देऊन गेली
माझ्यातल्या मी ला ,
तिच्यासंगे घेऊन गेली

आता माझ्या अस्तित्वाच्या शोधात ,
 तिलाच शोधत फिरतोय
एकाच या जन्मी जणू ,
मी पुन्हा पुन्हा मरतोय

काल ती उभी होती ,
आज मी उभा आहे
नियतीच्या चक्राचा ,
हाच गाभा आहे .

कधीतरी येईल ती ,
अशी आस उरी आहे
अन माफ करेल लगेच ,
अशी आस खरी आहे

पण हसू देऊन मला ,
ती दूर निघून गेली
त्या वाटेवरती पुन्हा ,
ती कधीच नाही आली

                         - अभिषेक पांचाळ
                         ( ९०२८८७५९५८ )