का गं हा दुरावा .....!

Started by Deepak Chavan, August 31, 2016, 11:12:04 PM

Previous topic - Next topic

Deepak Chavan

बारावीच शिक्षण गावात पूर्ण करून एक प्रियकर आपल्या मैत्रिणीला सोडून शहरात उच्चशिक्षणासाठी जातो.शहरात शिक्षण घेत असताना मनात प्रेम असूनही तो आपल्या मैत्रिणीला भेटू शकत नाही अश्यावेळी प्रेयसी गैरसमज करून घेते व दुसऱ्या व्यक्तीसोबत संसार थाटून बसते .या गोष्टीचा दोघांना पश्चताप होतो व प्रियकर शेवटी एक विनंती करतो कि आयुष्यात कधी भेटली तर किमान ओळखल्याचे हावभाव तरी तुझ्या चेहऱ्यावर असू दे ...अशी कल्पना करून ही कविता लिहिली आहे.

बारा इयत्ता शिकून मले हुशारपणा आला
गाव अन गल्लीबोळात माझाच बोलबाला झाला
बोलबाला माझा ऐकून,सारं गाव प्रेमात पडलं
नाही सुटलं कुणीही ,तुझंही माझ्याविना नडलं

प्रेम झालं तुले माझ्यावर ,पण शब्द अपुरे पडले
शब्दांना साथ मी दिली ,प्रेम आपले हे जडले
प्रेमाची जोडी,जसा शोभे राघु मैनेचा संसार
प्रेम पोटभर केलं तुझवर ,नाही ठेवला अहंकार


प्रेमाच्या वाटेमध्ये एकदा शहराचं बोलावणं आलं
साथ तुझी सोडली,माझं डीएडले एडमिशन झालं
आठवणी संग तुझ्या घेऊन मी शहरात आलो
आज नाही उद्या भेटायला येईन असं म्हणतच राहलो

दिसामागून दिस गेले नाही कळला हा काळ
खोट्यानाट्या प्रेमाचा घेई तू मजवर आळ
कसं सांगू तुले,तुज्याविना नाही माझ्या जीवनाला बहार
मज असं एकटाच सोडून का थाटला गं संसार

नाही घेत मी कोणता आळ,न करील तक्रार
कधी जीवनात भेटली तर डोळ्यांनी दे होकार
डोळ्याच्या होकारांनी माझ्या आठवणीना येईल आकार
आपण परत एकदा भेटलो, असं होईल स्वप्न साकार

कवी :- दिपक चव्हाण,
मु.पो.मुंदेफळ, ता.मेहकर ,जि .बुलढाणा
ईमेल :- chavan.deepak297@gmail.com