पोळा

Started by Asu@16, September 01, 2016, 02:38:47 PM

Previous topic - Next topic

Asu@16

          पोळा

श्रावण महिन्याच्या शेवटाला
पिठोरी अमावास्येला
बाळकृष्णे पोळासूर मारिला
स्मरून त्या स्मृतीला
करू साजरा पोळा,
होऊन सारे गोळा हो s होऊन सारे गोळा

बैलं माझी बहु गुणवान
करती हिरवं गार रान
काळ्या मातेची आन,
किती लावती लळा
करू साजरा पोळा,
होऊन सारे गोळा हो s होऊन सारे गोळा

माझ्या घराची शान
खपती संग रात्रंदेिन
हंगाम सुदीचा आला
शेतकरी मनी तोषला
करू साजरा पोळा,
होऊन सारे गोळा हो s होऊन सारे गोळा

ओढती शेतीचा भार
फुलविती बळीराजाचा संसार
विसरावे कसे उपकार
दावू भक्तिभाव भोळा
करू साजरा पोळा,
होऊन सारे गोळा हो s होऊन सारे गोळा

आंघोळ घालून सजवा धजवा
वंदन करून नैवेद्य चढवा
धेनूसुताला श्रीफळ वाढवा
घुमता नगारा, फोडा पोळा
करू साजरा पोळा,
होऊन सारे गोळा हो s होऊन सारे गोळा

- अरुण सु. पाटील 

https://www.facebook.com/AsuChyaKavita