मैना दूर दूर गेली ..........!

Started by Deepak Chavan, September 03, 2016, 02:37:41 PM

Previous topic - Next topic

Deepak Chavan

मैना दूर दूर गेली ..........!

कोरडा संसार थाटून मैना दूरदूर आकाशी गेली
राघू रडतच राहिला त्याची आठवण नाही झाली
मैना नव्हती नशिबात,आडवी आली तिची जात
राघू रडतच राहिला ,बघत बघतच तिची वाट

जातीच्या कुंपणांनी वाट वेगळी वेगळी झाली
राघू भटकत राहिला,मैनेला दिशा मिळाली
दिशा वेगळीच झाली,पण आकाश एक होतं
मैना दूरदूर गेली,पण राघूचं खरं प्रेम होतं

राघू काढे आठवणी,म्हणे सांगा तिले कुणी
राघू एकटाच आहे,नाही नात्यांची कहाणी
मैना सोडून हि गेली,झाली साधी हि रहाणी
मैना एकच होती ,नाही आता कुणी मनोमनी

तिच्या सासरचा निरोप घेऊन कोकिळा हि आली
म्हणे रावं,तुमच्यासारखी दुःख तिलाही झाली
रडत होती क्षणोक्षणी,डोळ्यात होतं भरलेलं पाणी
नाही विसरली आजही,काढते तुमच्या आठवणी

तिच्या सासरचा निरोप ऐकून,राघोले बरं बरं वाटलं
मैना नव्हती राघोसोबत,पण आठवणीच धुकं होतं दाटलं
"प्रेम एकदाच होते" हे राघोच्या मनालेही होतं पटलं
म्हणून आयुष्यात कुणालेच त्यानं "आय लव्ह यु" नाही म्हटलं.

कवी:- दिपक चव्हाण,
मु.पो.मुंदेफळ ,ता.मेहकर ,जि.बुलढाणा
संपर्क क्र.8108914410
ईमेल :-chavan.deepak297@gmail.com