आठवनिंचा गांव.

Started by गोपाल कल्याणकर, September 04, 2016, 06:48:20 PM

Previous topic - Next topic
   
   
                                  "आठवणींचा गांव"
           
       गांव हे गांव असतं. मनात अगदी रेखीव नक्षीसारखं कोरांव अन त्याची अप्रतिम कलाकृती निर्माण व्हावी असं तसंच काहिस गावपन असतं.
तिथ असतो फक्त आठवणींचा उजाळा,मनाच् स्वच्छंदि फुलपाखरू तिथ मनसोक्त बागड़त असत,लहान मुलप्रमाने खळखळुन हसत असतं. दुखःचा काळोख पसरलेला आणी अचानक मनाच्या कोपऱ्यात एखाद्या सोनेरी कवडसा डोकावून पहावा आणि सगळीकडे नवचैतन्य पसराव अगदी तस.
बावऱ्या मनाप्रमाने अगदी चंचल आणि स्वच्छंदी वाहनारी नदी, तीच ते नितळ झुलझुळणारं पानी,जणू जगन्याच् भानच देऊन जात. सप्तसुरांत ताल भिनुन जावा अंन आणी त्याच अगदी हृदयस्पर्शी संगीत व्हाव तसा धुंद मंजुळ वाहनारा वारा. एखाद्या अप्सरेने सोळा श्रृंगार करुण नवलाइने आपल सौंदर्य न्याहाळाव तशी हिरवी शाल पांघरलेली डोंगरझाडी,जनु निसर्गाने मुक्तहस्तपने आपले सौंदर्य, प्रेम आणि सर्वस्व यात ओतलेलं.

                          सैराटपने इथे जगलेल बालपन,आठवल की मन अगदी आनंदून जातं. भिरभिरतं पाखरू पंखात  नवचैतन्य संचारुन मनसोक्त नभात झेप घ्याव तसं.बालपनीचं ते निरागस निस्वार्थी जगन,खळखळून हसनं मनाला सादचं देऊन जात. आणि मग मनालाही नकळत कवितेचा गारवा जाणवल्याशिवाय राहत नाही.

मनाला ओढ़ लावणार इथल आपलेपण, आपुलकिचि माणसं, सुखदुःखात मिळणारी त्यांची साथ याची आज मनाला नितांत गरज आहे.ते आज हवय, हे सगळ आज कुठेतरी जाणवतय,भासतय परंतु एखादया मृगजळाप्रमाने क्षणात नाहीस झालय्,हरवलय कुठेतरी.

जिव्हाळ्याचा झुळझुळनारा ओढ़ा,अगदी तुटूंब भरून ओठंबुनि वाहनारा कोरडा पड़लाय. प्रेमाचा आपुलकिचा झरा आटलाय.
पारावर जमणाऱ्या गावकऱ्यांच्या गप्पा,विचारांची देवांघेवान अबोल झालीय.जणु हाताच्या मुठीतून वाळू निसटत जावी तशी.

           निसर्गाच् सौंदर्य डोळ्यात साठवन्यासाठी डोळे मिटावे अन उघड़तो तर क्षणात भयान स्मशान शांतता पसरावी अगदी तसंच मनाला काहिस जानवतय.
मग नकळतच सुरु होतो मनात भावनांचा आणि आठवणींचा लपाछापिचा खेळ,पडतो काळजात पिळ अन विचारतं मन सारख...!
जिथ मी बागड़लो,खेळलो, पडलो, हसलो अगदी फुलपाखराप्रमाने स्वच्छंदी मुक्तपने संचारलो.
हांच का तो गांव..? हांच का तो मी..? हिंच का ती आपली माती..? आणी हिंच का ती "आपली माणसं"..??

✍✍✍ @ गोपाल कल्याणकर.