मरणी बांधले मीपण

Started by विक्रांत, September 08, 2016, 12:28:05 AM

Previous topic - Next topic

विक्रांत



सुटली सरिता नसला किनारा
जगत पसारा | कालरूपी ||
पाहणाऱ्यास त्या पाहता पाहता
पाहणे नसता | कालातीत ||
तो अनुभवता जाणून घेता
अन आकळता अनुभवा  ||
पाहणारा सारे तेही तोच होता
सांडूनिया जाता तो कुठला ||
विचार हटले समयी विणले 
मरणी बांधले मीपण ही ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in