तिच्यावरच्या कविता

Started by विक्रांत, September 08, 2016, 12:52:55 AM

Previous topic - Next topic

विक्रांत

तिच्यावरच्या कविता
ती आता वाचत नाही       
कुठूनही कधी तिची
प्रतिक्रिया येत नाही 

तर मग कश्यासाठी 
लिहावे मी हे कळेना
प्रयोजना वाचून त्या
पावूल पुढे पडेना   

बऱ्याच वेळा वाटते
आता लिहिणे थांबवावे
या साऱ्या वह्यांना
फडताळात टाकून द्यावे

पण काही कारणाने
सुरु केले दारू पिणे
कारण नाहीसे होवूनही
चालू राहते अव्याहतपणे

तसा रोज लडखडत मी
त्याच त्या मधुशाळेत येतो
मीच विकतो मीच पितो 
मीच मरतो आणि जगतो

किती काळ पण माहित नाही
माझा काही भरोसा नाही
दिवस दावते शब्द कधी हे 
विझून जातील कळत नाही 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/