नको वाटते हि अवहेलना

Started by smadye, September 10, 2016, 12:35:13 AM

Previous topic - Next topic

smadye

नको वाटते हि अवहेलना

गणपती बाप्पा आला
आनंद ओसंडू लागला
लाडू मोदक आणि पक्वाने
यांचा घमधमात  सुटला

एक असो कि पांच दिवस
सात आणि अकरा दिवस
गणूची पूजा मांडिली
सेवा भावे भक्ती केली

हाथाने आशीर्वाद द्यावा
चरणी माथा माझा नमावा
अभयवचन तुम्ही द्यावे
अपराध माझे पोटी घ्यावे

अशी करावी प्रार्थना
आणि गणेशाला निरोप द्यावा
आनंद घेऊनि मग अश्रू ढाळत
पुढच्यावर्षी लवकर या असे विनवीत

अनंत चथुर्चशी येते
गणेशाचे  विसर्जन होते
रंगीबेरंगी सुबक गणूची मूर्ती
पाण्यामध्ये विलीन होते

विसर्जनाची अशी काय हि रिती,
पूजा करुनि मग द्यावी  गणेशाला जलसमाधी
विविधतेमध्ये गणूला पूजुनी
पाण्यामध्ये  का करावी रवानगी

हि रिती मला खटकते
पाण्यात गणूला सोडायला मन नाही वळते
दुसऱ्यादिवशी होणारी मूर्तीची विटंबना बघून
काळीज मात्र तीळ तीळ तुटते

आशीवाद देणार हाथ, धडापासून सुटलेला असतो
एकटाच वेगळा पडलेला असतो
हारांचा फास गळ्याबोवती घेऊन
प्रस्सन चेहरा कचऱ्यामध्ये कुडत असतो

हाथ एकीकडे पाय एकीकडे
धडाचा थांगपत्ता नसतो
आम्ही होतो आपुल्या कामात विलीन
गणपती बाप्पा मात्र अश्या भक्तीला रडत असतो

भकानो सांगा मन देते गो याची ग्वाही
नाही का वाटत हि पद्धत कुठे तरी थांबवावी
मोठ्या मोठ्या मूर्तीत गणेशाला शोधण्यापेक्षा
का न भावभक्तीची छोटी मूर्ती असावी

असावा भाव खरा खरा
त्यामध्ये गणेश साकारावा
त्याची विटंबना नाही तर पूजा करावी
स्वच्छ भावनेने हि काया त्याच्या चरणी लीन व्हाव्ही

सुप्रिया समीर मडये
madyesupriya@gmail.com