देवत्व...

Started by गणेश म. तायडे, September 12, 2016, 02:27:08 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

कुणी म्हणे देव आहे
कुणी म्हणे नाही
कुणी दगडात देव शोधे
कुणी दगडास लाथ मारी
श्रद्धा अंधश्रद्धेच्या काठी
विज्ञानाचे चक्र चालती
मानलेल्या देवांची भिती
लोक मनात का पाळती?
देव शोधण्या लोक भाबडी
पोथी पुराणे का चाळती?
प्राण्यांची देऊन आहूती
सुखे कोणास लाभती?
असावा देव नसावा देव
मुखी नको नुसता राम?
प्राक्तनाचा सोडूनी विचार
जगावे कष्टाने गाळूनी घाम
कुणास येई रे देवपण
घाव सोसल्या शिवाय?
वाटूनी देव धर्मांधात
मनापरी देव का हवाय?

- गणेश म. तायडे, खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com