भास कि आभास.....

Started by Pranav dhaigude, September 12, 2016, 06:25:19 PM

Previous topic - Next topic

Pranav dhaigude

कवी प्रणव धायगुडे
MB - 8888431255

आज कोणाच्या तरी छबित मि तुला पाहिल
पाहताच क्षणी माझ मलाच भान न राहील
काही क्षणांसाठी तूच आहेस अस भासल
अनोळखी होऊन भोवताली वावरतेयस अस वाटल

निपचित पडलेल्या हृदयाला माझ्या पुन्हा एकदा कोणीतरी फुंकर मारली
जिच्यापासून दूर पळतोय तिलाच जवळ पाहता धड़धड़ थोड़ी वाढली
धडकने या हृद्याचे माझ्या श्वसागणिस वाढले
जणू तुझ्या अतित्वाचे असे हे स्वप्न जगेपणीच पडले

भास की आभास तुझा थोडावेळ भावनांशी माझ्या खेळला
हळव्या या मनाला माझ्या चिकदळलेल्या जखमे प्रमाणे छळला
वास्तव्याचे भान येताच मनातील हुरहुर थोड़ी आटली
चेहर्यावरती माझ्या वेदनेची एक सुखद लहर उमटली

वाटल थोड बोलून जवळीक साधावी तिज्याशी
तुझ्याकडून प्रेम नाही मिळाल हिने मैत्री तरी करावी माझ्याशी
वाटल तुला विसरण्यासाठी तिलाच जवळ कराव
तिज्यामध्ये तुला ठेऊन जुने क्षण नव्याने अनुभवाव........