जगण्याचा फंडा

Started by शिवाजी सांगळे, September 13, 2016, 02:02:42 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

जगण्याचा फंडा

काही हसून बोलायचं
काही बोलून हसायचं
जीवन असचं आहे
हसता हसता रडायचं
न् रडतांना हसायचं...!

जगण्याचे कष्ट तर
सगळ्यांनाच आहेत,
मित्रा, कष्टाला डिवचुन
मजेत हसत खेळायचं...!

जोकरला विचारून बघ
असं कस जमवायचं?
दुःखात सुध्दा हसायचं
हसता हसता रडायचं...!

हसुन नाही जमलं
तर रूसुन बोलायचं
आपल्या लोकांचे
अश्रु पुसत बोलायचं...!

जगण्याचा फंडा
तसा सोपा आहे यार
दुसर्‍यांच्या मनात
घर करून रहायचं...!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९