कविता II खूप खूप रडायचंय , तुझ्या खांद्यावर मित्रा II

Started by siddheshwar vilas patankar, September 14, 2016, 01:35:55 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

खूप खूप रडायचंय

तुझ्या खांद्यावर मित्रा

ते दिवस अन रात्र एक होते

एक होते घड्याळाचे काटेसुद्धा

वेळ आपलीच होती

अन होती केलेली मजासुद्धा

तुझ्या दोस्तीला सलाम मित्रा

तू दिलेल्या वेळेला प्रणाम मित्रा

त्या केलेल्या एकत्र पुस्तक चोऱ्या

कधी खोड्या तर कधी मारामाऱ्या

तुझे अभ्यासप्रेम अजूनही

आहे लक्षात माझ्या

पुस्तकामध्ये पुस्तक धरुनी

वाचे गोष्टी नेपोलियनच्या

आठवतोय, मला तू शोध लावलेला

न्यूटनला बघितलंय जन्मलेला पुण्याला

हशा पिकताक्षणी वेड्या झाल्या कैक पोरी

हळूच एक गटवूनि सुरु झाली लव स्टोरी

तुझ्या ज्ञान नौकेत ती रममाण झाली

त्या वर्षी तुमची नौकाच बुडाली

असे कैक धंदे अन नाना त्या मस्त्या

आपल्याच होत्या साऱ्या गल्ल्या न वस्त्या

असे मित्र लाभो

मी भाग्यवंत साचा

तुझ्या आठवणीवर

उर्वरित प्रवास सुखाचा 


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C